पोस्ट्स

जानेवारी, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संक्रांतीचा पतंग

कणी बांधा रे बांधा रे कणी बांधा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! माध्यान्हीचा सूर्य जर खाली सरू दे, गुळपोळीचा स्वाद जिभेवर असू दे, मांजाच्या रीळाला भरधाव सोडा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! लख्ख लख्ख सारं नीळं आभाळ असू दे, सूर्यास्ताला अजूनही तास असू दे, वार्र्याची मर्जी वेगाने जोखा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! एकीकडे खिडकीमध्ये 'चिंगी' असू दे, नजरेच्या कोपर्यातून 'बंड्या' बघू दे, बघता-बघता पतंगाने उसळी मारू दे! उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! समोरच्या गच्चीबरोबर काटाकुटी चालू दे, वार्र्याच्या तालावर पतंग डोलू दे, कधी जबर खेचाखेच तर कधी थोडी ढील दे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! कधी गट्टी कधी कट्टी चाले पतंगाचा खेळ, भिन्न-भिन्न रंगाचा आकाशात मेळ, घराच्या दोन भिंतींतून बाहेर पडा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! पतंगाची उंची भारी, रेखाटली दिशा सारी, नजर वर वर करा, उत्साहाने डोळे भरा! क्षणासाठी सार्र्या चिंता विसर जरा रे! उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे!!

Vision 2013

पी-पी पो-पो करणार्यातला एक गाडीवान तरी हल्ली विचार करायला लागलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...|| थुंकणार्या- पिंकणार्या हजार तोंडामधला एक पान सोडायला लागलाय प्लास्टिकचे पाउस पाडणार्या इन्द्रामधला एक त्याला 'घाण' म्हणायला लागलाय भाजीवाल्याची पिशवी दिसता एक तरी जण 'नको'ची मान हलवायला लागलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...|| झोपड्यांना पाहून नाकं मुरडणार्यातला तिथेच शाळा भरवायला लागलाय त्याच गटारावरच्या शाळेमधला एक जण IAS चा फॉर्म भरायला लागलाय नेत्यांची ओळख दाखवणार्या हजारातला एक 'लाचखोरी'ला नकार द्यायला लागलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...|| मदतीचे हात मुंबईत कायमच होते... नेहमीच नांदते मुंबईत उत्साहाचे भरते... पण नव्या युगाच्या नव्या मतांचा प्रकाश आता आकाशात भरून राहिलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...!