पोस्ट्स

जुलै, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
बाकीचा दिवस कसा गेला ते पुढचा wireless connection मिळालं कि post करते :)

25 July 09- day 2 in Malaysia

प्रामाणिकपाने सांगायला हवा... उजाडता सूर्य बघण्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही… Malaysian airlines च्या कृपेने मधल्या रांगेतली थेट मधली सीट मिळाल्याने माझा view जरा वेगळा होता… एका बाजूला उभ्या चेहर्याचा एक मलेशियन आणि दुसर्या बाजूला शालीत पांघरलेली एक युरोपियन… Malaysian airlines च्या strict airhostesses च्या मानाने हे दोघे खूपच चांगले होते तसे… पण सूर्य पहायची इच्छा असणार्या मला window च नाही मिळाली त्याला कोण काय करणार… विमानाची वाट बघत बसल्यामुळे झालेलं रात्रीचं जागरण… बसून बसून मोडकळीला आलेली पाठ… supposedly Veg Malaysian जेवण जेवल्यावर पोटात झालेली खलबली आणि ट्रेनच्या प्रवासाला लाजवेल इतकी terbulant flight याचा जो परिणाम माझ्यावर व्हायचा तो सूर्य उजाडेपर्यंत झालेलं होता… पण एवढ्यात निभावलं असतं तर ती पहिली-वहिली ट्रीप कसली! ह्या विमानातून KL (Kuala Lampur) मध्ये उतरायच्या आधी काही दिवस अतिशय उत्साहात आणि स्वतःच्या planning चा अभिमान वाटत मी आणि माझ्या दोस्तमंडळीनी KL ते लंकावी जाणारी एक connecting flight book करण्याचा घाट घातला होता! “3 तास आहेत यार मध्ये... तो पर्यंत आपण दिल्लील...

Off to Malaysia.. Almost!

हं… उडण्याआधी पक्षी कधी कधी पंख फडफडवतात उन्हात उब घेत बसतात त्याची आठवण होत्ये मला आत्ता.. I am off to Malaysia... Almost! इंदिरा गांधी आंतर राष्ट्रीय विमानतळावर गेले 3 तास मी माझ्या विमानाची वात बघत बसल्ये… well the flight is delayed… check-in, immigration, security check आणि जेवण :) सगळं झालंय तरीही अजून तब्बल 1 तास वाट बघायचीय… विमान late आहे… म्हणून हा laptop उघडण्याचा खटाटोप… एक वर्षापूर्वी माझ्या पहिल्या विमान प्रवासाबद्दल मी जेवढी excited होते ती उत्सकता तो उत्साह आज मात्र कुठतरी हरवलाय… हल्ली माझ्या मनात उगाच आपला एक खूळ येऊन जाता कधी कधी… नाही नाही म्हणता म्हणता आपण विचार करणारे सगळ्याचं tension घेणारे मोठे झालो कि काय… नव्या ठिकाणी जाणं...नव्या माणसांना भेटणं...चुका करणं ,नेहमी perfect नसणं ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरत चाललोय की काय? पण ते खुळंच आहे याची खात्री आहे... कारण 2 तासांनी का होईना पण बाजूच्या सीट वर बसलेल्या हिप्पी मुलीला बघून तिच्याटोपितलं पीस कुठल्या पक्ष्याचा आहे या चा विचार माझ्या मनात डोकावायला लागलाय ;) इथे यायच्या आधी संध्याकाळ कधी गेली ह्याचा मात्र...

शेवटच्या वळणावर

सरत्या मातीवर पाय रोवून शिखराकडे पाहत राहावं… पाठीवरचं वजन सांभाळून पहिलं पाउल पुढे टाकावं… मनातले विचार अचानक मिळालेल्या मोकळ्या वेळेचा आधार घेतात चालत्या पायांना ताल येतो...तंद्रीत हातही साथ देतात पावसाची सरही संतत्धार ओल्या मातीत जिरत जाते… अंगावर रोमांच आले तरी नजर दूर दूर फिरत जाते… चेहऱ्यावरून ओघळणारा प्रत्येक थेंब आपलं असणं जाणवून देतो मनात वेगळीच उर्मी असते..म्हणून आपणही ते समजून घेतो… हिरव्या झाडीतले काळोखे क्षण सभोवतालची शांतता साठवून असतात… उत्साह उत्साह आत असतो पण ओठ शांतताच बाळगून असतात टेकाड येतं... पायांना एव्हाना स्पर्श जाणवत नाहीसा झालेला असतो… नव्याने पावसाचा मारा अंगावर येतो... आणि सुकलेला शर्ट चिंब ओलेता होतो… पाच तास…सहा तास...चालता चालता वेळेची गणती थांबलेली असते... शेवाळल्या दगडावर दोन क्षण बसून शिखरावर नकळत नजर टाकलेली असते… आता मागे बघणं नाही… मनात कुठला विचार नाही... फक्त एकच ध्यास घ्यावा… शिखाराशिवाय थांबणार नाही! पुढचं पाऊल…पुढचं वळण… पुढची वाट…पुढचे क्षण… पुढची हुरहूर…पुढचे श्वास… पुढेच जायचं कणकण… पावसाने आता भलताच जोर धरले...