पोस्ट्स

happiness लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बाग

सरसावून बाह्या गं कामाला लाग भरभरून फुलव आज आनंदाची बाग || आनंदाच्या बागेला हास्याची कमान अनुभव आणि आधार बागकामाचं सामान, पहिली रोपं लावायला तूच थोडी वाक भरभरून फुलव आज आनंदाची बाग | विश्वासाच्या रोपांना समजुतीचं सिंचन विचारांची प्रगल्भता बागेसमोरचं अंगण कधी हो सावली कधी दाखव उन्हाचा धाक भरभरून फुलव आज आनंदाची बाग | छोट्याश्या तुझ्या रोपट्याला मायेचं खळं कर प्रेमाच्या ओलाव्याची घाल थोडी त्यात भर कष्टांच्या फवारणिनी रोपाला तू राख भरभरून फुलव आज आनंदाची बाग |   आपुलकीनी प्रत्येक रोप ताठ उभं राहू दे दुःख आणि हेवेदावे निचरा होऊन जाऊ दे प्रत्येक रोपातून मग येईल प्रेमाची हाक भरभरून फुलव आज आनंदाची बाग |   मालकासारखं खत दे, माळ्यासारखे कष्ट दे, मुलांसारखं हसणं दे, फुलपाखराचा स्पर्श दे दिव्यासारखं डोळ्यात तेल घालून जाग भरभरून फुलत राहील आनंदाची बाग |