पोस्ट्स

kodak moment लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"click"

हार फुलांचा गळ्यात माळू चल आपण दोघे, थोडे लाजून थोडे हासून हातही हाती घे. "click" मंदिरातल्या देवा नमुनी भव्य कमानी ये, खांद्यावरचा पदर धरुनी हासून मी पाहे "click" बोटीमधुनी, विमानातुनी, फिरुनी चल येऊ, कारंजे वा बागेमध्ये 'असे' उभे राहू "click" अवघडलेपण गेले आता खांद्यावरती हात, डोळ्यामधले हासू सांगे ' हीच कायमची साथ' "click" तुझे कुटुंब माझे होवो, माझे मीपण सारुनी जावो, भेटी ऐशा कैक होवो, क्षणन् क्षण कैद होवो... "click ...click...click" मोठे आपण झालो आता पिकू लागले केस, ओलांडून मी सहजची आले ही 'साठी' ची वेस वाढदिवस, सण-सोहळे, झाले हे साजरे, मुले आपली परदेशाची झाली आता लेकरे... नातू आणि नातीचा चेहरा पाहिला आज, दोघेही ल्याली होती 'halloween ' चा साज जाणीव झाली... जाणीव झाली उजाडला तो दिवस आज शेवटी, या पिढीची त्या पिढीशी व्हायला हवी भेटी ठाऊक त्यांना असेल काय आजी आजोबांबद्दल? संसाराच्या पसार्याचे प्रेम हेच मुद्दल? याच दिवसासाठी केले "click " कैक फोटो, क...

कोडॅक मोमेंट!

लग्नाचा हॉल, माणसांची संख्या, फुलं, माळा आणि अक्षता अक्ख्या! मँचिंगचे ब्लाउस, साडीला बिडिंग... पत्रिकेचा मजकूर.. हँपी वेडिंग! आमंत्रणं, सजावट, इमेल की फोन? देण्याघेण्याच्या पिशव्या आणि मेंदीचे कोन! आलं, मिरच्या कोथिंबीर फ्लॉवर... दुध दही लोणी आणि साखर ! मामा, मामी, मामीचा भाऊ, भावाचे मित्र, मित्राची जाऊ! घराला रंग, सोफ्याला कव्हर, बिल्डींगच्या गेटलाही लग्नाचा फ्लेवर... केटरिंग डेकोरेशन double checking! हनिमून पॅकेज आणि advance booking! ग्रहमक, पिवळी साडी...बहिणीचा मान, अन्नपूर्णा देवी आणि उखाण्याचं पान... जाताना गाडीसाठी गुलाबाचा हार , VIP ची बॅग आणि सामानाचा भार मेकअप, हेअरस्टाईल checklist च्या घड्या, इस्त्रीचे कपडे मुंडावळ्यानच्या लड्या! पायधूणं, रांगोळी आरतीचं तबक... दाराला तोरण मनात धकधक... मुहूर्त... अंतरपाट... मंगलाष्टकं, कावेरी नर्मदा..सावधान ... लोकं! जेवणं, reception ... एखादी छबुक कॉमेंट! पाठवणी आणि हूरहूर... कोडॅक मोमेंट!