पोस्ट्स

trekking लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेवटच्या वळणावर

सरत्या मातीवर पाय रोवून शिखराकडे पाहत राहावं… पाठीवरचं वजन सांभाळून पहिलं पाउल पुढे टाकावं… मनातले विचार अचानक मिळालेल्या मोकळ्या वेळेचा आधार घेतात चालत्या पायांना ताल येतो...तंद्रीत हातही साथ देतात पावसाची सरही संतत्धार ओल्या मातीत जिरत जाते… अंगावर रोमांच आले तरी नजर दूर दूर फिरत जाते… चेहऱ्यावरून ओघळणारा प्रत्येक थेंब आपलं असणं जाणवून देतो मनात वेगळीच उर्मी असते..म्हणून आपणही ते समजून घेतो… हिरव्या झाडीतले काळोखे क्षण सभोवतालची शांतता साठवून असतात… उत्साह उत्साह आत असतो पण ओठ शांतताच बाळगून असतात टेकाड येतं... पायांना एव्हाना स्पर्श जाणवत नाहीसा झालेला असतो… नव्याने पावसाचा मारा अंगावर येतो... आणि सुकलेला शर्ट चिंब ओलेता होतो… पाच तास…सहा तास...चालता चालता वेळेची गणती थांबलेली असते... शेवाळल्या दगडावर दोन क्षण बसून शिखरावर नकळत नजर टाकलेली असते… आता मागे बघणं नाही… मनात कुठला विचार नाही... फक्त एकच ध्यास घ्यावा… शिखाराशिवाय थांबणार नाही! पुढचं पाऊल…पुढचं वळण… पुढची वाट…पुढचे क्षण… पुढची हुरहूर…पुढचे श्वास… पुढेच जायचं कणकण… पावसाने आता भलताच जोर धरले...