पोस्ट्स

2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुणीही कधीही-Preface

Saw a fantastic movie called "Before Sunrise" the other day... the poem is a product of the same..

कुणीही... कधीही...

इमेज
कुणीही... कधीही... आयुष्यात... येतं जातं... आणि मनात घर करून जातं... बुकातून तिनं वर पाहावं... अन मनमोकळं हसावं... गाडी उशिराची म्हणून मी ही तिला छेडावं... तिनं बिनदिक्कत बोलाया लागावं... एखादी अशीच सकाळ... वा एकत्र जावी संध्याकाळ... गप्पा-टप्पात जावा काळ... जसा एक क्षण, नाही तास तीन-चार... कशी ओळख झाली... अं हं आठवत नाही... पण हरकत नाही... तीही बोलतच राही.. तोही बोलतच राही... तुला आवडतं गाणं... कुठलं... मलाही... तेच... कसं न कळावं फिरत बसावं... रस्त्या-गल्ल्यातून... तरी थकून न जावं... कसं... ते नं कळवं... केस भुरभुरे... जिवणी नाजूक... खुलं हास्य... असं की मला ही हसवावं... "काय झालं?" तिनं मधूनच विचारावं... टपली मारून मी नुसतंच नाही म्हणावं... कुणीही... कधीही... आयुष्यात... येतं जातं... आणि मनात घर करून जातं... गाडी तिची जशी स्टेशनात आली... नजर भिरभिर फिराया लागली... बोलण्यात लक्ष्य नाही... गाडी निघाली म्हणून मधेच घाबरवी... मी तिला पहात राहावं... निघता निघता...नंबर घ्यायचं राहून जावं... तरी ही कुणीही कधीही आयुष्यात येतं जातं... आणि मनात घर

थोड़ं नवीन थोड़ं जुनं

इमेज
गेल्या दोन दिवसात घडलेल्या गोष्टींचा थोडक्यात वृत्तांत... शाळेतल्या मित्राला दहा वर्षानंतर भेटले... दोन complete strangers शी जिगरी मैत्री झाली... वाईन घातलेला घरी केलेला पास्ता खाल्ला आणि amazing लागला... रात्री २ ला झोपून सकाळी ११ ला उठले तरी दुपारी ३ तास झोपले! बंगलोर च्या थंडीत Death by chocolate नावाचं अप्रतीम आईस-क्रीम खाल्लं (शेवटी) ताप चढला .. पण संध्याकाळपर्यंत उतरला :) गेले दोन दिवस घर मित्र-मैत्रिणींनी गजबजलेलं होतं... अजूनही असा वाटतंय की अत्ता संध्याकाळ होईल आणि सगळे दारात उभे राहतील.. :) काही जुनी दोस्त मंडळी काही नवीन चेहरे...

नाइलाज को क्या इलाज!

झालं असं की माझ्या ऑफिस मधून मला नेहमीच्या networking sites वापरता येत नाहीयेत... त्यामुळे सहज चेक करण्यासाठी एकदा माझ्या ब्लॉग ची लिंक टाइप करून पाहिली and to my relief atleast this seemed to be working! ज्यांच्याशी नेहमी contact मधे असते त्यांना माझ्या या नाईलाजाबद्दल पूर्ण कल्पना आहे ... आधी चेन्नई (मद्रास), मग गुडगाँव (दिल्ली) आणि आता बंगलोर अश्या गेल्या २ वर्षात माझ्या तीन बदल्या झाल्यात आणि प्रत्येक ऑफिसच्या सवई वेगळ्या... माणसं वेगळी... आणि सहाजिकच accepted rule- breaking वेगळं! कधीतरी आयुष्यात पुढे पु. लं.च्या पुणेकर-मुंबईकर-नागपूरकर प्रमाणे दिल्लीकर-चेन्नैकार-बंगालोरकर लिहायला हरकत नाही... जैसा देस वैसा भेस करत मी हि त्या त्या गावांचा (metros चा म्हणायला हवं!) भाग बनले... आणि accepted -rule-breaking च्या यादीत भर पडत गेली :) पण या बंगलोर च्या ऑफिस मध्ये मात्र social sites च्या वापरला मज्जाव आहे data security च्या कारणासाठी .. आता या नाईलाजाला कोण काय करणार! बाबा (बाबा रामदेव नाही, माझे बाबा! ) म्हणतात तसं नाईलाज को क्या इलाज म्हणत त्यातून एक मार्ग काढला! blogging ! So here I a

वीट आलाय...

वीट आलाय... प्रत्येक गोष्ट पैश्यात मोजण्याचा... पैश्यासाठी माणसांना बोलण्याचा आणि बोलून घेण्याचा... पैसे वाचवण्याचा... पैश्याशिवाय काही भाषा नसण्याचा... वीट आलाय... सकाळी लवकर उठण्याचा... चहा करून घेण्याचा... साठीला आलेल्या कामवालीकडून निर्लज्जपणे काम करून घेण्याचा... पेपर बिल, दुध बिल, फलाना-डीमाका बिल भरण्याचा वीट आलाय... आरश्यातल्या चेहऱ्याकडे बघून सुंदर दिसण्याचे प्रयत्न करण्याचा... जुना शर्ट टाकवत नाही म्हणून परत परत वापरण्याचा... पेपरमधल्या बातम्यांनी नाराज होण्याचा... रिक्षा वाल्याशी हुज्जत घालण्याचा... वीट आलाय... आपण late येऊ तेव्हाच बॉस लवकर येण्याचा... खोटं खोटं हसून गुड मॉर्निंग म्हणण्याचा... competition च्या नावाखाली comparison करत वावरणार्यांचा... आपणही नकळत त्याचा भाग होऊन जाण्याचा... वीट आलाय... गेट मधून I-card घालून निनावी बनून कंपनीत येण्याचा... एका चुकीसाठी एक तास lecture ऐकण्याचा... लहान म्हणून हिणवून घेण्याचा... मोठं म्हणून अपेक्षांच्या ओझ्याचा... वीट आलाय... तिकीट महाग म्हणून ट्रीप कॅन्सल करण्याचा... हक्काची सुटी मिळूनही घरी न जाता येण्याचा... रविशंकर चा प्रोग्

माझा वाढदिवस

इमेज
वय वर्ष एक: “सुलू, तिला जरा तीट लाव हो आज… गोरी पान आहे त्यामुळे काळा ड्रेस अगदी खुलून दिसतोय… मामाकडे कशी बघत्ये बघ?!” (इति राम मामा) “विलास, तू ओवाळणीची तयारी कर, मी बसत्ये तिला घेऊन… बघू दे तरी आजीकडे राहत्ये की नाही…ते!” (आजी) “अरे राम, तिला जरा इकडे बघायला लाव रे… फोटो काढतोय तिचा बाबा हे कळतंय तरी का?!”(बाबा) “विलास भाऊ, तुमी बगीतला कशी चालेत ती… नवे बूट आणले आय तवा पासून ती एक जागेवर बसत नै! आमची 'पूर्वी' छोटी होती न तवा ती पण असाच करणार एकदम…!! (आमचे मुब्र्याचे शेजारी, 'पूर्वी' ताईचे बाबा) “अहो, जरा तिच्या तोंडातून ते फुल काढा न... सगळा घातलेला हार तोंडात घालत्ये ती खुशाल...!”(आई) “ब…बा…. आ…आई..का...का...”…(hehe मी...वय वर्ष एक) “च्यायला विलास, अनिकेत आणि केतकी दोघे जाम लौकर बोलायला लागले नै?!... ए केतकी….काका कडे ये ये ये…”(आमचा काका) वय वर्ष दहा: “ आई मी तो गुलाबी फ्रोक घालते ना… please…. आणि ती मोत्याची माळ घालू? बाबा मला कुणाला कुणाला बोलवायचं सांगू?..मला ना डिंपल, प्रिया, संपदा, रश्मी, स्नेहा, आणि…”(मी) “आरती, दृष्ट काढ हो आज केतकीची संध्याकाळी…”(आजी) “अहो,

स्वातंत्र्य

इमेज
वार्यावर गर्रर फिरताना पतंग मोकळा हसला... "स्वातंत्र्य" हा शब्द मला तेव्हाच बरं का सुचला?...

उब

झोपेचा प्रयत्न आणि हृदयाची स्पन्दनं... काही खुळे विचार आणि मनाची सांत्वनं... सुखाचा सदरा मिळाल्यागत झोपेची मेख कळेल काय?... अंगाई गीत म्हणणारी उब गोधडीत मिळेल काय?...

नवलाई

बंगलोरच्या थंडीची थंडाई अनुभवली आज... रात्रीच्या आकाशाची निळाई अनुभवली आज... दवाच्छादीत रास्ते, पिवळ्या दिव्याची उब, नव्याने या शहराची नवलाई अनुभवली आज...

सुगंधी अत्तर

आनंद आनंद म्हणजे नक्की काय? कष्टाच्या पुढचं आणि समाधानाआधीचं पाऊल… आयुष्याच्या वाटेवर छोट्या-छोट्या वळणानंतर असलेली पाणपोई… डोळे मिटून उघडण्यापूर्वीच झालेली खात्री?… की सकाळी उठल्यावर आईचा चेहरा पाहण्याचं नशीब…? केलेल्या कामाचं कौतुक होणार या विचारानच होणार्या गुदगुल्या…? की शिकवलेला धडा अचूक आठवल्याचा गर्व…? रिकाम्या भांड्यात पावली पडल्यावर signal वर दिसलेलं हसू…? की उषम्यानंतरच्या सावलीचा मिळालेला हिरवा आडोसा…? ‘Yours Lovingly’ वाचल्यावरही पुन्हा एकदा वाचून झालेलं पत्र… किंवा दोन तास रांगेत उभं राहिल्यावर हातात आलेलं दापोलीच्या रातराणीचं तिकीट… अनेक दिवसांनी phone वर ऐकलेला एखादा आवाज… की हसर्या खिदळणार्या सवंगड्यांनी भरून गेलेलं अंगण… पावसाची पहिली सर… अचानक मिळालेली डायरी… पहाटेची काकडआरती आणि रात्रीच्या पालखीचा जल्लोष… आनंद आनंद म्हणजे नक्की काय? अनुभवातून मिळालेलं उत्तर आणि आठवणींचं सुगंधी अत्तर…

हट्टस्थान

गंडस्थान, वंद्यस्थान तसं माझं ही एक हट्टस्थान केव्हाही कधीही तिच्याकडे जावं हक्कानं ठीय्या मारून समोर बसावं सांगावं- मला हे हे हवंच आहे पटवून द्यावं तिच्या लेखी ते थोडंच आहे लहान व्हावं- बुडबुड्यांच्या डबीसाठी रस्त्यात ठांड मांडूनच बसावं हे घेतलंस तरच उठीन असं सांगूनच ठेवावं उशिरा उठावं- तुझ्याच हातचा चहा हवा असा आग्रह धरावा पेपर वाचत वाचत भुरका घ्यावा, तो मात्र तिच्या दृष्टीनं दुराग्रह ठरावा नवा ड्रेस घालावा- पण matching म्हणून फक्त फक्त तिचेच कानातले घालावेत तीही म्हणेल-'छान दिसेल, कानातले डुलतेच असावेत' रात्री जगावं- आदल्यादिवशीच अभ्यास करून पहिलं येण्याची मिजास दाखवावी काँफी देण्यासाठी उठलेल्या तिला तुमची ही लकबही खास वाटावी! मैत्रिणींबरोबर उशिरा यावं- साडेबारा होऊनही कावर्याबावर्या चेहर्यानं घरात यावं पुढच्या वेळी मात्र तीच सबब न देण्याचं ध्यानात ठेवावं! नवे मार्ग निवडावे- आपला हट्ट म्हणून तिनंही ते मानून घ्यावे आपण मात्र हक्क असल्यागत ते मागून घ्यावे! अनेक वर्षं मधे जावीत- तिच्या मांडीत डोकं ठेऊन झोपण्याचा हट्ट आजही आपण करावा... त्याच सहजत

तरंग

तुझा विचार करते आणि लेखणीतून शब्द उमटतात माझ्या नसशील तू तर...या विचारानं रोमांच उठतात माझ्या शब्द माझे पण भावना भाबड्या तुझ्या विचार तू करतोस आणि मनात तरंग उठतात माझ्या!

काहूर

तुझी वाट पाहता पाहता पहाट जाहली... माझे नैन आसावले तरी चाहूल ना लागे... कशी किती रे मी धीर सांग धरू तू येण्याचा माझे चैन हरपले का काहूर ना माजावे...?

पाउस

पाउस पाउस... कशी अंधारी आणतो... मन मनाच्या आकाशी...शुभ्र चांदणं ओढतो... तुझ्या नसण्याने डोळे माझे पाणावले इथे... तिथे झुरशी तसा तू इथे पाउस पडतो...

थोड़े अनुभव लिहिलेले... पण upload करायचे राहिलेले...

२५ जुलाईला Malaysia मधे असताना त्या दिवसाचे अनुभव लिहिले होते पण network नसल्यामुळे post नाही करता आले...ते अत्ता केले आहेत... Malaysia ची ट्रीप खरच अविस्मरणीय होती...तिसर्या दिवसाचे अनुभव लिहिले आहेत... तेही upload करीन... काही दिवस मात्र प्रवास training या मुळे अनुभव लिहायला वेळ नाही झाला...नंतरचे अनुभव मनातल्या अल्बममध्ये कायमचे कोरलेले आहेत :)
बाकीचा दिवस कसा गेला ते पुढचा wireless connection मिळालं कि post करते :)

25 July 09- day 2 in Malaysia

प्रामाणिकपाने सांगायला हवा... उजाडता सूर्य बघण्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही… Malaysian airlines च्या कृपेने मधल्या रांगेतली थेट मधली सीट मिळाल्याने माझा view जरा वेगळा होता… एका बाजूला उभ्या चेहर्याचा एक मलेशियन आणि दुसर्या बाजूला शालीत पांघरलेली एक युरोपियन… Malaysian airlines च्या strict airhostesses च्या मानाने हे दोघे खूपच चांगले होते तसे… पण सूर्य पहायची इच्छा असणार्या मला window च नाही मिळाली त्याला कोण काय करणार… विमानाची वाट बघत बसल्यामुळे झालेलं रात्रीचं जागरण… बसून बसून मोडकळीला आलेली पाठ… supposedly Veg Malaysian जेवण जेवल्यावर पोटात झालेली खलबली आणि ट्रेनच्या प्रवासाला लाजवेल इतकी terbulant flight याचा जो परिणाम माझ्यावर व्हायचा तो सूर्य उजाडेपर्यंत झालेलं होता… पण एवढ्यात निभावलं असतं तर ती पहिली-वहिली ट्रीप कसली! ह्या विमानातून KL (Kuala Lampur) मध्ये उतरायच्या आधी काही दिवस अतिशय उत्साहात आणि स्वतःच्या planning चा अभिमान वाटत मी आणि माझ्या दोस्तमंडळीनी KL ते लंकावी जाणारी एक connecting flight book करण्याचा घाट घातला होता! “3 तास आहेत यार मध्ये... तो पर्यंत आपण दिल्लील

Off to Malaysia.. Almost!

हं… उडण्याआधी पक्षी कधी कधी पंख फडफडवतात उन्हात उब घेत बसतात त्याची आठवण होत्ये मला आत्ता.. I am off to Malaysia... Almost! इंदिरा गांधी आंतर राष्ट्रीय विमानतळावर गेले 3 तास मी माझ्या विमानाची वात बघत बसल्ये… well the flight is delayed… check-in, immigration, security check आणि जेवण :) सगळं झालंय तरीही अजून तब्बल 1 तास वाट बघायचीय… विमान late आहे… म्हणून हा laptop उघडण्याचा खटाटोप… एक वर्षापूर्वी माझ्या पहिल्या विमान प्रवासाबद्दल मी जेवढी excited होते ती उत्सकता तो उत्साह आज मात्र कुठतरी हरवलाय… हल्ली माझ्या मनात उगाच आपला एक खूळ येऊन जाता कधी कधी… नाही नाही म्हणता म्हणता आपण विचार करणारे सगळ्याचं tension घेणारे मोठे झालो कि काय… नव्या ठिकाणी जाणं...नव्या माणसांना भेटणं...चुका करणं ,नेहमी perfect नसणं ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरत चाललोय की काय? पण ते खुळंच आहे याची खात्री आहे... कारण 2 तासांनी का होईना पण बाजूच्या सीट वर बसलेल्या हिप्पी मुलीला बघून तिच्याटोपितलं पीस कुठल्या पक्ष्याचा आहे या चा विचार माझ्या मनात डोकावायला लागलाय ;) इथे यायच्या आधी संध्याकाळ कधी गेली ह्याचा मात्र

शेवटच्या वळणावर

सरत्या मातीवर पाय रोवून शिखराकडे पाहत राहावं… पाठीवरचं वजन सांभाळून पहिलं पाउल पुढे टाकावं… मनातले विचार अचानक मिळालेल्या मोकळ्या वेळेचा आधार घेतात चालत्या पायांना ताल येतो...तंद्रीत हातही साथ देतात पावसाची सरही संतत्धार ओल्या मातीत जिरत जाते… अंगावर रोमांच आले तरी नजर दूर दूर फिरत जाते… चेहऱ्यावरून ओघळणारा प्रत्येक थेंब आपलं असणं जाणवून देतो मनात वेगळीच उर्मी असते..म्हणून आपणही ते समजून घेतो… हिरव्या झाडीतले काळोखे क्षण सभोवतालची शांतता साठवून असतात… उत्साह उत्साह आत असतो पण ओठ शांतताच बाळगून असतात टेकाड येतं... पायांना एव्हाना स्पर्श जाणवत नाहीसा झालेला असतो… नव्याने पावसाचा मारा अंगावर येतो... आणि सुकलेला शर्ट चिंब ओलेता होतो… पाच तास…सहा तास...चालता चालता वेळेची गणती थांबलेली असते... शेवाळल्या दगडावर दोन क्षण बसून शिखरावर नकळत नजर टाकलेली असते… आता मागे बघणं नाही… मनात कुठला विचार नाही... फक्त एकच ध्यास घ्यावा… शिखाराशिवाय थांबणार नाही! पुढचं पाऊल…पुढचं वळण… पुढची वाट…पुढचे क्षण… पुढची हुरहूर…पुढचे श्वास… पुढेच जायचं कणकण… पावसाने आता भलताच जोर धरले

|| आणायाच्या गोष्टी ||

येतोच आहेस इथे तर माझं काम थोडं कर… यादी आहे छोटीशी, या गोष्टी तेवढ्या बरोबर आण... नाक्यावरच्या गरम वडापावची जिभेवर तरंगणारी चव आण... तिथेच बाजूला चिंचेच्या झाडाची भर दुपारची सावली आण रस्त्यातून जाताना दिसणारे हसरे ओळखीचे चेहरे आण... बाजूच्या आजोबांनी दिलेली ती लीमलेटची गोळी आण... खेळणाऱ्या मुलांचा बाँल हरवून परत मिळाल्याचा आनंद आण क्रिकेटची मँच बघतानाचा जल्लोषही बांधून आण… भावाची पाठीवरची थाप आण… मैत्रिणीचं अखंड खिदळणं आण... आईची प्रेमळ हाक आण... बाबांचा आशीर्वाद आण… आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे... मातीचा सुवास आण… असु दे खाली आलेली ओली झाडाची फांदी… रस्ता आण धुतलेला… आणि आण तुझे मोकळे क्षण ... या वर्षी पावसाळ्यात तिथे नाही मी... तू येतोच आहेस तर माझं थोडं काम कर... या गोष्टी तेवढ्या तुझ्या गाठी बांधून आण...

अरे पावसा पावसा...

कसा कसा हा उन्हाळा लाही लाही अंगा अंगी... इथे उसासे मी सोडी तिथे झाली तुझी नांदी अरे पावसा पावसा असा निष्ठुर कसा तू? महाराष्ट्री तू आलासी इथे येई केव्हा सांगी... तुझ्या आगमनी माझे बेत आभाळाएवढे… तुझा स्पर्श मन मोही तो सुगंधही आवडे कशी राहू रे मी सांग मृतगंधाविना इथे... रुक्ष झाडं सरती माती हिरवाईचे वावडे... आठवते सर तुझी अन सोसाट्याचा वारा… सारीकडे पळापळ गार थेंबांचा तो मारा... एका आडोश्याला उभी वाट पाहे थांबायाची सर कोसळोनी येते, आणि तोल जातो सारा! चिंब भिजून मनात झाला अवघाची आनंद सारे डोलाया लागले मन हो माझे स्वछंद… डोळीयात माझ्या पाणी पण बाहेर ओसाड आठवते आज सारे… वारा वाही दूर मंद… माझी माणसे प्रदेश सारे दूर ते राहिले... पण तुझ्याच भरोशी इथे सारे मी साहिले... येई येई वेगी आता तुझे करते आर्जव… तुझ्या भेटीत तिकडच्यांचे हसू मी पाहिले…हसू मी पाहिले...

बदल

बदल…हवासा ...नकोसा… कारण नसताना… कारण असताना… त्रास देणारा, त्रास कमी करणारा… बदल… बदल हा निसर्गाचा नियम आहे… बदल ही एकच गोष्ट निसर्गात कायम आहे… तरीही बदल म्हटला की मन पाऊल मागे घेतं... बदल…प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावर...बदलाचे वारे हेलावून सोडतात… मनातली वादळं उसळी ऊंच मारतात…आणि निर्ढावलेलं मन परत पोखरुन पोखरुन काढतात बदल....

मागल्या वळणावर...2

मी ही हसून मग माझं पाऊल पुढे टाकते पण नकळत मागे वळून नमस्काराला वाकते "मनु, खुप मोठी हो !" शब्द ऐकू येतात... या जिव्हाळ्याचा ओलावा , डोळे ओले करून जातात उंच कितीही गेले तरी माझी मुळं तिथेच आहेत त्यांचे आशीर्वाद , म्हणून माझे शिरपेच आहेत सुख-दुःख सार्या वेळी परत तिथेच पाहीन... आनंदाचा क्षणक्षण कायम तिथेच वाहीन!!!

मागल्या वळणावर...1

अनेक अनेक दिवसांनी आज असं झालं हसून हसून डोळ्यात माझ्या पाणी थोडं आलं उंच उंच जाता जाता मागे काही राहिलं आज आठवण झाली त्यांची म्हणून मागे वळून पाहिलं त्याच मागल्या वळणावर आजही ते आहेत डोळे त्यांचे भरलेले , ओठावर हसू आहे .... आजही त्या डोळ्यातून तोच विश्वास आहे "तू पुढे जा! " प्रत्येक श्वास सांगतो आहे...

hello after a long time...

Yes i did miss my blog :) Office, Mumbai trips, Chennai programs.. in between all of this.. I somehow forgot that part of me which used to look at everything from a diiferent angle...but I still have it within me... during this time.. I wanted to write so much.. but something or the other kept coming in between.. finally today, I decided I have to write again.. :) feels really good now. As always, i enjoyed wrting this piece, hope u all will enjoy reading it.. P.S. had written a chalroli long abck, but it too was lying in the draft.. have updated it now. It reads " Bagh ..."

आनंदाचा पाया2

जुन्यांचा अन् नव्यांचा अखंड व्हावा मेळ, जुने नवे एक सारे अशी यावी वेळ ! इच्छा तेथे मार्ग आणि प्रेम तिथे माया हाच असेल नाही का, आनंदाचा पाया?!

आनंदाचा पाया

जुना काळसर फोटो , पुस्तकातलं मोरपिस आईचं आलेलं पत्र , अचानक मिळालेले पैसे विस ... आनंदाला कारण कुठलंही चालतं, मोठं नसलं, तरी आहे त्या कारणात भागतं... खुश होण्यासाठी काही आपली माणसं हवी... 'आपली' असली की झालं, असेत ना का ती नवी ?!