माझा वाढदिवस

वय वर्ष एक:
“सुलू, तिला जरा तीट लाव हो आज… गोरी पान आहे त्यामुळे काळा ड्रेस अगदी खुलून दिसतोय… मामाकडे कशी बघत्ये बघ?!” (इति राम मामा)
“विलास, तू ओवाळणीची तयारी कर, मी बसत्ये तिला घेऊन… बघू दे तरी आजीकडे राहत्ये की नाही…ते!” (आजी)

“अरे राम, तिला जरा इकडे बघायला लाव रे… फोटो काढतोय तिचा बाबा हे कळतंय तरी का?!”(बाबा)
“विलास भाऊ, तुमी बगीतला कशी चालेत ती… नवे बूट आणले आय तवा पासून ती एक जागेवर बसत नै! आमची 'पूर्वी' छोटी होती न तवा ती पण असाच करणार एकदम…!! (आमचे मुब्र्याचे शेजारी, 'पूर्वी' ताईचे बाबा)

“अहो, जरा तिच्या तोंडातून ते फुल काढा न... सगळा घातलेला हार तोंडात घालत्ये ती खुशाल...!”(आई)
“ब…बा…. आ…आई..का...का...”…(hehe मी...वय वर्ष एक)
“च्यायला विलास, अनिकेत आणि केतकी दोघे जाम लौकर बोलायला लागले नै?!... ए केतकी….काका कडे ये ये ये…”(आमचा काका)


वय वर्ष दहा:
“ आई मी तो गुलाबी फ्रोक घालते ना… please…. आणि ती मोत्याची माळ घालू? बाबा मला कुणाला कुणाला बोलवायचं सांगू?..मला ना डिंपल, प्रिया, संपदा, रश्मी, स्नेहा, आणि…”(मी)
“आरती, दृष्ट काढ हो आज केतकीची संध्याकाळी…”(आजी)
“अहो, तुम्ही जरा केकच्या order चा काय झाला ते बघाल का?.. आणि थोडे आणखीन बटाट्याचे wafers हवेत आणायला…शाळेत वाटायला गोळ्या आणल्यात त्या पिशवीत केकची रिसीट असेल बघा...” “केतकी, नवा ड्रेस घातला की आधी देवाला नमस्कार करावा...आजीला नमस्कार केलास का?” “ए रेखा हिची सागर-चोटी बघ ना ग घालता येत्ये का?! मी तोपर्यंत साडी बदलून घेते जरा लोकं यायच्याआत”(आई... जाम घाईत!)
“ताई, मी पण येऊ तुझ्याबरोबर डिंपलला बोलवायला?! येतो ना… बाबा मी पण जाऊ?!... Pleeeasssse“ (कौस्तुभ उर्फ नानू, माझा छोटा भाऊ)
“केतकी बाळा, गाण्याची practice केल्येस ना?? आज एक छान गाणं म्हणून दाखवणार ना… मी धरतो त्रिताल… विकास practice करायचा ते बघून बघून, थोडा शिकलोय... तेवढं वाजवू शकीन नक्की... आणि बाबांचं एक ऐकायचं... आता नीट मांडी घालून बसायला शिक... फ्रोक नीट करून बस बघू…”(बाबा)
“अम्मा... कल नै आयेगा...”(आमची कामवाली बाई!)
“ओ काका, शिंग फुटल्येत म्हणजे काय...?! काका काका सांगा ना!”(रेखा ताई, आमची नवी शेजारी)
HAPPY BAADDAY TO YOU!!! ….HAPPY BADDAY TOOO YOUUU….!(सगळे उपस्थित!)



वय वर्ष वीस:
“मोठ्ठी हो… पळ आता लौकर नाहीतर वाढदिवसाच्या दिवशी… पाहिलंच lecture बुडायचं...थांब जरा हे तीर्थ देतो ते घेऊन जा.. सत्यंत वर्तेन परीशिंचयामी…”(बाबा)
“मनु, डबा नेणारेस ना?!... आज काय करायचं आपण जेवायला रात्री?!.. आपण पावभाजी करूया का?.. किंवा मी काय म्हणते अहो, आज संध्याकाळी जेवायला बाहेर जाऊयात का?”(आई)
“ ताई, हे तुझ्यासाठी… तुला हवी होती ना नाकतली चमकी… मला हवी होती तशी नाही मिळाली पण.. बघ I don’t know if u will like it.. आणि ए बाबा.. मी नाही येणारे ok रात्री बाहेर-बिहेर.. आज India Vs Pakistan match आहे...”(कौस्तुभ... “ताई please आता मला नानू म्हणू नको यार!”)
“आई... Actually I was thinking. की मी माझ्या मित्र-मैत्रिणींना बाहेर जेवायला घेऊन जाईन… so.. please आज पावभाजीचा plan नको ना… बाबा, मला थोडे पैसे द्याल?... आई मी निघते ok?”(मी-कॉलेज-कुमारी)
“Hieeeeee!!!... Oh my god, someone is looking too much!.. Happy birthday babes! Lipstick and all!.. अच्चा ऐक…Hi काकू, मी आहे ऋत्विका!... अच्चा ऐक… संध्याकाळी तुझा काय plan आहे? I am going to come with you ok?! घरी आलीस College मधून call कर! Byeee… have a rocking day ahead… Happy b’day once again.. यार”(ऋत्विका. माझी जीवश्च-कंठश्च मैत्रीण)



आज:
आज माझ्याबरोबर आहे स्मिता-माझी Room mate… आणि या वरच्या सगळ्या सगळ्या मंडळींचे आशीर्वाद… दर वर्षी माझा वाढदिवस काहीतरी करून स्पेशल करणारी ही माणसं म्हणजे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत…आजचं हे post आहे या सार्यांची मनपासून काढलेली आठवण... मी, केतकी आठवले, त्यांच्या आयुष्याचा भाग बनले आणि हे सारे जण माझ्या आयुष्याचा भाग!... नकळत…सहज…अगदी अलगद… आता घरापासून दूर राहत्ये... नव्या उमेदीनं नव्या आयुष्यांचा भाग बनत्ये तेव्हा जाणवतं... की मी आज आहे ती या सगळ्यांमुळे… माझे विचार, माझी मतं॥ माझी आवड-निवड सारं या सार्यांनी घडवलं… त्यांनी हे ही शिकवलं की नव्या नात्यांची गुंफण करताना... जुन्या नात्यांची कास धरूनच कापड विणावं... म्हणूनच माझ्या आठवणीतल्या असंख्य सोनेरी क्षणांपैकी तीन क्षणांची ही पुष्पं आपल्या समोर सादर।

निरांजानाचं ताट, रांगोळीवरला पाट...
गोडधोड केलं, भलताच केला थाट-माट

कितीही मोठी झाले तरी या दिवशी लहान होणार…
केकचा पहिला मोठ्ठा तुकडा आजही मीच खाणार!

बाहेर आहे घराच्या पण आठवणीत तोच दिवस
घरचे काही जवळचे आणि माझा वाढदिवस…माझा वाढदिवस...

टिप्पण्या

Rajan Mahajan म्हणाले…
मानलं यार ! काय स्मरणशक्ती आहे. १ वर्षाची असल्यापासुनच्या सगळ्या गोष्टी तुला आठवतात. हाडाची "आठवले" आहेस.

Jokes apart, खूप छान लिहिलेयस. gharapasun ani gharachyanpasun laamb vadhadivas me hi nukatach anubhavala. ata kahi vadhadivas sajara karayache vay nahi pan aaple koni tari javal asave ase ya divashi nakki vatale mala.
ketki Athavale म्हणाले…
:) Rajan, watla kay tula! ugach nahi lavat athavale adnaav :)
ani Vadhdiwasabaddalchya baddal ekdam Bha. po.! :).
Prasad Vaidya म्हणाले…
itka chan ahe ki ugach kahitari comment lihit nahi..........sunder...bass
Unknown म्हणाले…
Simply super...you have this amazing power of coming up with something so strong which actually if anyone reads can say "Oh, this is something even I have thought of"...you know what I mean..
But they don't do it..YOU do it..and so you deserve the credit..Keep writing..I m your fan..

And happy birthday...belated though..:):)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2