पोस्ट्स

2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरकती वाळू

आनंदाच्या लाटांना किनार्यावरूनच पाहून कसं चालेल? समुद्राच्या अथांगतेचा पत्ता लागत नाही म्हणून नावेतच बसायला घाबरून कसं चालेल? एकाच पावलाचा अवकाश आहे… वेळेचा सगळा खेळ आहे… लाटांचा आनंद घ्यायचा असेल तर बेधडक उडी मारायला हवी! सूर्यास्तानंतरचा सूर्योदय पाहायचा असेल, तर भीती बाजूला सारायला हवी!

आशा

"कॉलर कर नीट हो जरा धीट हळूच डोळे मीट लावते छान तीट" "तुझा ड्रेस धुवायला हवा उद्या १५ ऑगस्ट आला वाण्याकडून साबण तूच आण आज वेळ नाही मला…" "आई, एक गोष्ट होती… बाईंनी सांगितलेली… 'फी' आणलीस तरंच शाळेत ये" - ती उभी गारठलेली… "बाळा, मालकाला विचारलंय, उद्या नक्की देते… पावसात उभी नको राहू, उगा सर्दी होते…" पळाली ती चिमुरडी शाळेच्या दिशेने तसा, आईने लावला आवाज, नव्या उमेदीने! "पाव किलो मटार, २२ रुपयाने! पाव किलो मटार, २० रुपयाने!!" दादरचा फुटपाथ, सकाळचा प्रहर… स्वतंत्र भारतात, आशेला बहर!

तेरावा तास

काहीतरी नवं करायचंय, नेहमीच्या बारा ताशी घड्याळात                        तेरावा तास शोधायचाय हा तास नाविन्याचा असेल,  कल्पकतेचा असेल, आस्वादाचा असेल, सानिध्याचा असेल. तासाला मिनिटं साठ, पण क्षण अनेक, प्रत्येक क्षण आशेनी भरलेला कधी उत्साहाचे भरते आणणारा, कधी चुरशीची जुगलबंदी ऐकवणारा, कधी  शांत, निरव पाण्यासारखा, कधी खळखळणाऱ्या झऱ्यासारखा… या तासात मोठा आणि छोटा काटा                    सारख्याच आकाराचा… रंगीबेरंगी गोष्टीनी नटलेल्या                    भिंतीवरच्या चित्रासारखा तास! एकच तास पुरे, अधिक नको, पण जो मिळेल तो हक्काचा हवा, ज्या तासातून बाकीच्या बारा तासांना उर्जा मिळेल असा. शोधला तर सापडेल हा तास, कधी पहाटेच्या थंडीत, कधी रात्रीच्या झोपाळलेल्या काळोखात, कधी दुपारच्या पेंगणाऱ्या वार्यात… शोधायला हवा हा तेरावा तास!

कलियुग

गावचे आंबे संपत आले… उकाड्यानी जीव हैराण झाला… उन्हाळ्याच्या सुटीचं शेपूट उरलं… समोरचा हिरवा डोंगरही ओसाड विराण झाला… पावसानी तेवढं 'वेळेवर येण्याचं' मनावर घेतलंय म्हणून, नाहीतर जगात बाकी सगळं कलियुग आहे मित्रा!

A "Thank You"

Thank yous’ lose their purpose when used too much or not for the right person… Right here being the one for whom, just the ‘Thank you’ won’t suffice… For the fact that - the support and the strength that suddenly comes to you because of this person, can’t always be acknowledged in words… May be in a smile… or a cup of coffee , but that too is not always an option.. And you are left with nothing but ‘Not to reply’ anything for the act that he’s done that made you so happy, content, humble in the first place.. So here’s me NOT thanking you… For guiding me, supporting me, and most importantly believing in me… Just a no reply… You of course can respond saying you are NOT welcome, but then again.. I know that is not true too!

*and then there are those*

There are people who inspire, there are ones you admire… And then there are those… who are just there… Invisible right next to you when you need them…waiting for you to give a call… Constantly monitoring if you need that one little push So you can grow, and fly, and inspire, and be someone’s support… just like them! You know they are there, but they never ask for your acceptance… They shy away from getting recognized and blush when you say thank you… But they say all the good things about you to all they know… Just so others can share their views about you… just so you get recognized for the talent they know you have always had… They are nowhere but everywhere… You may manage to overlook them or admire someone else for a while… But the day you feel very low or slow or disappointed or even disheartened… Pick up a phone… dial that number… walk that mile or simply give a shout… They will hear you out… and may not say a word… but THAT somehow makes all the difference… It

काही चोरलेले क्षण

काही चोरलेले क्षण... हसवलेले...हरवलेले...हरखलेले... हसर्या चेहर्याचं आर्जव..आधार, आमंत्रण... परतवलेल्या नजरेचा कटाक्ष, पुन्हा हवेतले हसरे कण... डोळ्यांच्या पापण्या, पाणीदार रोखती नजर, नकळत निर्माण होणारी खेच जबर! गप्पा, अवघडलेली शांतता.... गप्पा, अचानक एकमत, भेटतंच राहायचे प्रयत्न, विचारांची ओढाओढ सतत... नको असताना हवं असणं, हवंहवंसं नकोपण, मनात आकंठ लहरी, चेहर्यावर भावनांचं आंदण... एक प्रहर, सलगी आणि सहजता, मनात बालिश खिदळणं, दाखवायला मात्र प्रगल्भता... हलकेच सुटलेली विचारांची गाठ, कैक तपं ओळख असल्याचा भास... निघायची झालेली वेळ, जुने काही बंध असल्याची झालेली खात्री, निरोप घेताना झालेली विचारांची कात्री.. एका प्रहराच्या भेटीत असा वाटू शकतं का? हे काही वेगळंच आहे... पण सत्यात उतरू शकतं का? वास्तवाची झालेली जाणीव, शब्दांची भासलेली उणीव... शहारलेले कण, हेलावलेले मन...आणि... ....काही चोरलेले क्षण!

संक्रांतीचा पतंग

कणी बांधा रे बांधा रे कणी बांधा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! माध्यान्हीचा सूर्य जर खाली सरू दे, गुळपोळीचा स्वाद जिभेवर असू दे, मांजाच्या रीळाला भरधाव सोडा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! लख्ख लख्ख सारं नीळं आभाळ असू दे, सूर्यास्ताला अजूनही तास असू दे, वार्र्याची मर्जी वेगाने जोखा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! एकीकडे खिडकीमध्ये 'चिंगी' असू दे, नजरेच्या कोपर्यातून 'बंड्या' बघू दे, बघता-बघता पतंगाने उसळी मारू दे! उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! समोरच्या गच्चीबरोबर काटाकुटी चालू दे, वार्र्याच्या तालावर पतंग डोलू दे, कधी जबर खेचाखेच तर कधी थोडी ढील दे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! कधी गट्टी कधी कट्टी चाले पतंगाचा खेळ, भिन्न-भिन्न रंगाचा आकाशात मेळ, घराच्या दोन भिंतींतून बाहेर पडा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! पतंगाची उंची भारी, रेखाटली दिशा सारी, नजर वर वर करा, उत्साहाने डोळे भरा! क्षणासाठी सार्र्या चिंता विसर जरा रे! उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे!!

Vision 2013

पी-पी पो-पो करणार्यातला एक गाडीवान तरी हल्ली विचार करायला लागलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...|| थुंकणार्या- पिंकणार्या हजार तोंडामधला एक पान सोडायला लागलाय प्लास्टिकचे पाउस पाडणार्या इन्द्रामधला एक त्याला 'घाण' म्हणायला लागलाय भाजीवाल्याची पिशवी दिसता एक तरी जण 'नको'ची मान हलवायला लागलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...|| झोपड्यांना पाहून नाकं मुरडणार्यातला तिथेच शाळा भरवायला लागलाय त्याच गटारावरच्या शाळेमधला एक जण IAS चा फॉर्म भरायला लागलाय नेत्यांची ओळख दाखवणार्या हजारातला एक 'लाचखोरी'ला नकार द्यायला लागलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...|| मदतीचे हात मुंबईत कायमच होते... नेहमीच नांदते मुंबईत उत्साहाचे भरते... पण नव्या युगाच्या नव्या मतांचा प्रकाश आता आकाशात भरून राहिलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...!