Vision 2013

पी-पी पो-पो करणार्यातला एक गाडीवान तरी हल्ली विचार करायला लागलाय
गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...||

थुंकणार्या- पिंकणार्या हजार तोंडामधला एक पान सोडायला लागलाय
प्लास्टिकचे पाउस पाडणार्या इन्द्रामधला एक त्याला 'घाण' म्हणायला लागलाय
भाजीवाल्याची पिशवी दिसता एक तरी जण 'नको'ची मान हलवायला लागलाय
गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...||

झोपड्यांना पाहून नाकं मुरडणार्यातला तिथेच शाळा भरवायला लागलाय
त्याच गटारावरच्या शाळेमधला एक जण IAS चा फॉर्म भरायला लागलाय
नेत्यांची ओळख दाखवणार्या हजारातला एक 'लाचखोरी'ला नकार द्यायला लागलाय
गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...||

मदतीचे हात मुंबईत कायमच होते...
नेहमीच नांदते मुंबईत उत्साहाचे भरते...

पण नव्या युगाच्या नव्या मतांचा प्रकाश आता आकाशात भरून राहिलाय
गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...!

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
तू बरह फॉंट वापरत असलीस आणि तुला असणा"र्‍या" असं टाईप करायचं असलं, तर टिप:

र्‍या = r + ^ + yaa

बाकी कविता नेहमीप्रमाणे ए-वन! :)
अनामित म्हणाले…
Hey Ketki, ekdam masta ahe kavita!
Agadi mood ani topic nusar tu vaparlele rough shabda tuzhya nehamichya bhashehun nirale ahet....pan ekun solid jamya hai!

prasad vaidya

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2