काही चोरलेले क्षण
काही चोरलेले क्षण...
हसवलेले...हरवलेले...हरखलेले...
हसर्या चेहर्याचं आर्जव..आधार, आमंत्रण...
परतवलेल्या नजरेचा कटाक्ष, पुन्हा हवेतले हसरे कण...
डोळ्यांच्या पापण्या, पाणीदार रोखती नजर,
नकळत निर्माण होणारी खेच जबर!
गप्पा, अवघडलेली शांतता.... गप्पा, अचानक एकमत,
भेटतंच राहायचे प्रयत्न, विचारांची ओढाओढ सतत...
नको असताना हवं असणं, हवंहवंसं नकोपण,
मनात आकंठ लहरी, चेहर्यावर भावनांचं आंदण...
एक प्रहर, सलगी आणि सहजता,
मनात बालिश खिदळणं, दाखवायला मात्र प्रगल्भता...
हलकेच सुटलेली विचारांची गाठ,
कैक तपं ओळख असल्याचा भास...
निघायची झालेली वेळ, जुने काही बंध असल्याची झालेली खात्री,
निरोप घेताना झालेली विचारांची कात्री..
एका प्रहराच्या भेटीत असा वाटू शकतं का?
हे काही वेगळंच आहे... पण सत्यात उतरू शकतं का?
वास्तवाची झालेली जाणीव, शब्दांची भासलेली उणीव...
शहारलेले कण, हेलावलेले मन...आणि...
....काही चोरलेले क्षण!

टिप्पण्या