कुणीही... कधीही...

कुणीही... कधीही... आयुष्यात... येतं जातं...
आणि मनात घर करून जातं...

बुकातून तिनं वर पाहावं... अन मनमोकळं हसावं...
गाडी उशिराची म्हणून मी ही तिला छेडावं...
तिनं बिनदिक्कत बोलाया लागावं...

एखादी अशीच सकाळ... वा एकत्र जावी संध्याकाळ...
गप्पा-टप्पात जावा काळ...
जसा एक क्षण, नाही तास तीन-चार...

कशी ओळख झाली...
अं हं आठवत नाही... पण हरकत नाही...
तीही बोलतच राही.. तोही बोलतच राही...

तुला आवडतं गाणं... कुठलं... मलाही... तेच... कसं न कळावं
फिरत बसावं... रस्त्या-गल्ल्यातून... तरी थकून न जावं...
कसं... ते नं कळवं...

केस भुरभुरे... जिवणी नाजूक...
खुलं हास्य... असं की मला ही हसवावं...
"काय झालं?" तिनं मधूनच विचारावं...
टपली मारून मी नुसतंच नाही म्हणावं...

कुणीही... कधीही... आयुष्यात... येतं जातं...
आणि मनात घर करून जातं...

गाडी तिची जशी स्टेशनात आली...
नजर भिरभिर फिराया लागली...
बोलण्यात लक्ष्य नाही...
गाडी निघाली म्हणून मधेच घाबरवी...
मी तिला पहात राहावं...
निघता निघता...नंबर घ्यायचं राहून जावं...

तरी ही
कुणीही कधीही आयुष्यात येतं जातं...
आणि मनात घर करून जातं...

टिप्पण्या

Prasad Vaidya म्हणाले…
CLASS!!! asa kadhi honaar maze???? thoda wela karata tari sukhad swapna disali.....
Rajan Mahajan म्हणाले…
खूप छान कविता आहे. टाळ्या ! प्रत्येक ओळीसाठी टाळ्या !!
Aniket C म्हणाले…
:D
Nice... though i never had such experience, would always want to have one!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2