अरे पावसा पावसा...

कसा कसा हा उन्हाळा लाही लाही अंगा अंगी...
इथे उसासे मी सोडी तिथे झाली तुझी नांदी
अरे पावसा पावसा असा निष्ठुर कसा तू?
महाराष्ट्री तू आलासी इथे येई केव्हा सांगी...

तुझ्या आगमनी माझे बेत आभाळाएवढे…
तुझा स्पर्श मन मोही तो सुगंधही आवडे
कशी राहू रे मी सांग मृतगंधाविना इथे...
रुक्ष झाडं सरती माती हिरवाईचे वावडे...

आठवते सर तुझी अन सोसाट्याचा वारा…
सारीकडे पळापळ गार थेंबांचा तो मारा...
एका आडोश्याला उभी वाट पाहे थांबायाची
सर कोसळोनी येते, आणि तोल जातो सारा!

चिंब भिजून मनात झाला अवघाची आनंद
सारे डोलाया लागले मन हो माझे स्वछंद…
डोळीयात माझ्या पाणी पण बाहेर ओसाड
आठवते आज सारे… वारा वाही दूर मंद…

माझी माणसे प्रदेश सारे दूर ते राहिले...
पण तुझ्याच भरोशी इथे सारे मी साहिले...
येई येई वेगी आता तुझे करते आर्जव…
तुझ्या भेटीत तिकडच्यांचे हसू मी पाहिले…हसू मी पाहिले...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2