पोस्ट्स

सप्टेंबर, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुगंधी अत्तर

आनंद आनंद म्हणजे नक्की काय? कष्टाच्या पुढचं आणि समाधानाआधीचं पाऊल… आयुष्याच्या वाटेवर छोट्या-छोट्या वळणानंतर असलेली पाणपोई… डोळे मिटून उघडण्यापूर्वीच झालेली खात्री?… की सकाळी उठल्यावर आईचा चेहरा पाहण्याचं नशीब…? केलेल्या कामाचं कौतुक होणार या विचारानच होणार्या गुदगुल्या…? की शिकवलेला धडा अचूक आठवल्याचा गर्व…? रिकाम्या भांड्यात पावली पडल्यावर signal वर दिसलेलं हसू…? की उषम्यानंतरच्या सावलीचा मिळालेला हिरवा आडोसा…? ‘Yours Lovingly’ वाचल्यावरही पुन्हा एकदा वाचून झालेलं पत्र… किंवा दोन तास रांगेत उभं राहिल्यावर हातात आलेलं दापोलीच्या रातराणीचं तिकीट… अनेक दिवसांनी phone वर ऐकलेला एखादा आवाज… की हसर्या खिदळणार्या सवंगड्यांनी भरून गेलेलं अंगण… पावसाची पहिली सर… अचानक मिळालेली डायरी… पहाटेची काकडआरती आणि रात्रीच्या पालखीचा जल्लोष… आनंद आनंद म्हणजे नक्की काय? अनुभवातून मिळालेलं उत्तर आणि आठवणींचं सुगंधी अत्तर…

हट्टस्थान

गंडस्थान, वंद्यस्थान तसं माझं ही एक हट्टस्थान केव्हाही कधीही तिच्याकडे जावं हक्कानं ठीय्या मारून समोर बसावं सांगावं- मला हे हे हवंच आहे पटवून द्यावं तिच्या लेखी ते थोडंच आहे लहान व्हावं- बुडबुड्यांच्या डबीसाठी रस्त्यात ठांड मांडूनच बसावं हे घेतलंस तरच उठीन असं सांगूनच ठेवावं उशिरा उठावं- तुझ्याच हातचा चहा हवा असा आग्रह धरावा पेपर वाचत वाचत भुरका घ्यावा, तो मात्र तिच्या दृष्टीनं दुराग्रह ठरावा नवा ड्रेस घालावा- पण matching म्हणून फक्त फक्त तिचेच कानातले घालावेत तीही म्हणेल-'छान दिसेल, कानातले डुलतेच असावेत' रात्री जगावं- आदल्यादिवशीच अभ्यास करून पहिलं येण्याची मिजास दाखवावी काँफी देण्यासाठी उठलेल्या तिला तुमची ही लकबही खास वाटावी! मैत्रिणींबरोबर उशिरा यावं- साडेबारा होऊनही कावर्याबावर्या चेहर्यानं घरात यावं पुढच्या वेळी मात्र तीच सबब न देण्याचं ध्यानात ठेवावं! नवे मार्ग निवडावे- आपला हट्ट म्हणून तिनंही ते मानून घ्यावे आपण मात्र हक्क असल्यागत ते मागून घ्यावे! अनेक वर्षं मधे जावीत- तिच्या मांडीत डोकं ठेऊन झोपण्याचा हट्ट आजही आपण करावा... त्याच सहजत...

तरंग

तुझा विचार करते आणि लेखणीतून शब्द उमटतात माझ्या नसशील तू तर...या विचारानं रोमांच उठतात माझ्या शब्द माझे पण भावना भाबड्या तुझ्या विचार तू करतोस आणि मनात तरंग उठतात माझ्या!

काहूर

तुझी वाट पाहता पाहता पहाट जाहली... माझे नैन आसावले तरी चाहूल ना लागे... कशी किती रे मी धीर सांग धरू तू येण्याचा माझे चैन हरपले का काहूर ना माजावे...?

पाउस

पाउस पाउस... कशी अंधारी आणतो... मन मनाच्या आकाशी...शुभ्र चांदणं ओढतो... तुझ्या नसण्याने डोळे माझे पाणावले इथे... तिथे झुरशी तसा तू इथे पाउस पडतो...

थोड़े अनुभव लिहिलेले... पण upload करायचे राहिलेले...

२५ जुलाईला Malaysia मधे असताना त्या दिवसाचे अनुभव लिहिले होते पण network नसल्यामुळे post नाही करता आले...ते अत्ता केले आहेत... Malaysia ची ट्रीप खरच अविस्मरणीय होती...तिसर्या दिवसाचे अनुभव लिहिले आहेत... तेही upload करीन... काही दिवस मात्र प्रवास training या मुळे अनुभव लिहायला वेळ नाही झाला...नंतरचे अनुभव मनातल्या अल्बममध्ये कायमचे कोरलेले आहेत :)