पोस्ट्स

सप्टेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऐश

परवा विचारलं एकानी कॉलेजच्या दिवसांबद्दल… म्हटलं "मी खूप श्रीमंत होते", काय सांगू तुला माझ्या ऐशीबद्दल ?! ही ऐश होती 'वेळे'ची, होता भरपूर वेळ! कसाही उधळला, नव्हता जमा-खर्चाचा मेळ… बदकांच्या तळ्याजवळ बसा, किवा university च्या कट्ट्यावर मैदानातला जिमखाना धुंडाळा, किवा नाटकांचे प्रवेश गच्चीवर! संध्याकाळभर आयुष्याची स्वप्न रंगवा किवा गाणी म्हणा स्वतःसाठी टुकार नवीन छंद शोधा, कसलीच नव्हती आडकाठी! 'ऐश' होती अशी जरी, त्याची किंमत नव्हती तेव्हा… मुबलक वेळ मिळालाय याची गंमत नव्हती तेव्हा… आज घड्याळाच्या काट्यावर जेव्हा वेळेची गणितं मांडते, तेव्हा जाणवते 'ती' श्रीमंती… दुसऱ्यासाठी काम करताना स्वतःसाठी वेळ नाही… तारेवरची कसरत करताना घड्याळ पाहणं खेळ नाही… गेलेल्या वेळेतला वजा करून, आज थोडा bonus म्हणून, पंचविसावा तास, देईल का कुणी आणून?