पर्जन्य प्रार्थना
ये रे पावसा पावसा आता अंत नको पाहू तुझ्या पायाशी लोटांगणेही माथा ही टेकवू । येशी आकाशाच्या मार्गे विधात्याचे रूप घेशी कष्ट साचलेत फार आता माझ्या मायदेशी | लोक भुकेले तहाने डोइ छप्परही नाही त्यांच्या आसवांना लपायाला समयही नाही | मोठा गनीम बलाढ्य आता मृत्यू हेच सत्य .... असा कडाडून ये तू भेद अदृश्य हे युद्ध | अरे पावसा पावसा तुझा माफीचा स्वभाव माणसाची चूकभूल पोटी घाल दया दाव | थेंबाथेंबातून तुझ्या तुझी माया बरसुदे शून्यातून पुन्हा उभा आज माणूस राहू दे | धरतीची मी लेक केतकी साकडं घालते कधी येशील रे आता तुझी वाट मी पाहते | अरे पावसा पावसा अवतरशील धर्तीवर तुझ्या कृपेवर आम्ही उभे जोडुनिया कर... जोडुनिया कर ...|