25 July 09- day 2 in Malaysia

प्रामाणिकपाने सांगायला हवा... उजाडता सूर्य बघण्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही… Malaysian airlines च्या कृपेने मधल्या रांगेतली थेट मधली सीट मिळाल्याने माझा view जरा वेगळा होता… एका बाजूला उभ्या चेहर्याचा एक मलेशियन आणि दुसर्या बाजूला शालीत पांघरलेली एक युरोपियन… Malaysian airlines च्या strict airhostesses च्या मानाने हे दोघे खूपच चांगले होते तसे… पण सूर्य पहायची इच्छा असणार्या मला window च नाही मिळाली त्याला कोण काय करणार…
विमानाची वाट बघत बसल्यामुळे झालेलं रात्रीचं जागरण… बसून बसून मोडकळीला आलेली पाठ… supposedly Veg Malaysian जेवण जेवल्यावर पोटात झालेली खलबली आणि ट्रेनच्या प्रवासाला लाजवेल इतकी terbulant flight याचा जो परिणाम माझ्यावर व्हायचा तो सूर्य उजाडेपर्यंत झालेलं होता… पण एवढ्यात निभावलं असतं तर ती पहिली-वहिली ट्रीप कसली! ह्या विमानातून KL (Kuala Lampur) मध्ये उतरायच्या आधी काही दिवस अतिशय उत्साहात आणि स्वतःच्या planning चा अभिमान वाटत मी आणि माझ्या दोस्तमंडळीनी KL ते लंकावी जाणारी एक connecting flight book करण्याचा घाट घातला होता! “3 तास आहेत यार मध्ये... तो पर्यंत आपण दिल्लीला परत जाऊन येऊ…” इति आमच्यातल्या एकाचे उदगार होते… असो.
तर ती connecting flight होती 10.30 वाजता.. उशीर होता होता आम्ही KL ला पोचलो 10.10 ला. आता पटापट check-in करावं तर अजून तंगड्यात तंगडी चिकार होती.. एक अक्खच्या अख्खं stadium आत राहील असं हे Kuala Lampur चं नेत्रदीपक विमानतळ… Immigration आणि Baggage counter शी पोचायला सुधा आतल्या आत ट्रेन पकडायला लागली आम्हाला.. त्यात ती ट्रेन पकडून जायचं ही कल्पना झेपायला गेली पाच मिनिटं… बाकी एरवी ते सगळं जाम impressive वाटलं असतं पण एक पाय आधीच्या विमानात आणि दुसरा पुढच्या विमानात असताना.. माणसाच्या कौतुक करण्याच्या क्षमता थोssड्या मर्यादित होतात! तरी हे manageable होतं(Airport वरच्या staff नी खरच उत्तम सहकार्य केलं… आमचं विमान पुढच्या 20 मिनिटात सुटणारे हे कळताच आम्हाला VIP च्या वरताण treatment मिळाली :) म्हणून सहज हा शब्द इथे वापरू शकले) तर आणखीन एक छोssटासा problem असा होता की चेन्नईवरून आमच्याच बरोबर येणारा आमचा एक colleague आम्हाला KL ला भेटून मग आमचा लवाजमा लंग्कावी ला जायचा होता... पण KL ला पोचल्यावर मोबाईल झाले बंद आणि कोण कुठे आहे याचा पत्ता लागणं अशक्य झालं... परत एकदा airport च्या authorities नी आम्हाला प्रचंड सहकार्य केलं... आम्ही तिघीनीही कामं वाटून घेतली... एकजण त्याला शोधायला गेली आणि दोघींनी immigration नंतर सामान ताब्यात घेतलं…Malaysia चा जो कोण देव(जी कोण देवी) आहे तो/ ती आमच्यावर कृपा करून असावी कारण… finally आमची चांडाळ चौकडी एकत्र आली आणि indicators वर लावलेल्या हिरव्या बाणांचा मागोवा घेत आम्ही Domestic Airport कडे धूम ठोकली :) अक्षरशः जीव मुठीत धरून धावलो सगळे... पाठीवर laptop ची बॅग आणि हातानी एक चाकं वाली मोठी बॅग मागे पळवत सगळे entry gate शी पोचलो… believe it or not, वे were actually 5 minites before time.. well almost! Coz this flight too got delayed by an hour :) Cheers to Malaysian airlines for being late for once :P
लंग्कावी मध्ये पाउल ठेवलं आणि computer मधल्या एखाद्या सुंदर wallpaper मध्ये जाऊन पोचल्यासारखं वाटलं… पाहावं तिथे हिरवे डोंगर... छोटे छोटे धबधबे... आपल्या कोकणाचा तोच ओलसर आपलेपणा आणि Malaysia च्या स्वच्छतेची त्यात भर… रस्ते खूप मोठे नाहीत पण अगदी maintained..manicure केल्या सारखे... जागेजागेवर छोटी छोटी सांभाळून वाढवलेली झाडं... रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरवर पसरलेलं हिरवंगार गवत... सगळंच कसं मनउल्हासित करणारं...रात्रीच्या प्रवासानी आणि सकाळच्या adventure नी दमायला झालेला असूनही Malaysia च्या नैसर्गिक सौंदर्याची सहजता आणि निसर्गानी इथे केलेली भरभराट नजरेत भरल्याशिवाय राहिली नाही…एखाद्या नव्या ठिकाणी गेलं की त्या जागेची पहिली झलक होताच अगदी नकळतपणे माझा एक exercise मनातल्या मनात सुरु होतो… एक. ही जागा मुंबई पेक्षा कशी आणि किती वेगळी आहे... दोन. ह्या जागेचं अमुक अगदी कोकणातल्या तमुक भागासारखं दिसतं! हो… लहानपणापासूनच कोकणाबद्दल भयंकर prejudiced असल्याने कुठल्याही किनार्याकाठच्या जागेला हा benchmark पार करावाच लागतो… तर आजूबाजूचं आवार, रस्ते बघताना आणि मनात माझा नेहमीचा exercise करत असतानाच “The Lanai Langkawi Resort” च्या दारासमोर आमची कॅब थांबली…रूमची चावी मिळायचीच खोटी होती…दात घासणे (माझा प्रवास ओवेर्निघ्त होता!) गरम पाण्याच्या शॉवरला मान देणे :) हे सोपस्कार झाले आणि पांढर्या स्वच्छ bedsheet असलेल्या बेडवर अंग झोकून दिलं. गेलेल्या काही तासांचा विचार करत कधी झोप लागली कळलंच नाही...मनसोक्त झोप काढून जाग आली तेव्हा अंग थोडं दुखत होतं पण मन एकदम fresh!संध्याकाळी "Underwater World" नावाच्या मत्स्यालयात जाऊन आलो… It was nice… लहानपणी शाळेतर्फे तारापोरवाला मात्स्यालायला गेले होते त्याची मजा काही यात नव्हती..असो...तर त्या underwater world च्या बाहेर थोडं चालून गेल्यावर बरीच छोटी छोटी restaurants होती...त्यातलाच एक म्हणजे “T Jay” नावाचा एक pizza corner… हॉटेल तसं साधं होतं पण इतक्या कालाकुसारीना सजवलेलं होतं... and you could see that somebody’s great thoughts have gone into decorating it:) आम्ही पुढे काही विचार करायच्या आतच एका सडपातळ बांध्याच्या चाळीशीत वाटणाऱ्या बाईनं आमचं स्वागत केलं “may I help U?”एक cotton ची सैल pant आणि तितकाच ढगळ sleevless t-shirt घातलेली ती बाई आमच्या समोर एक मस्त smile देत उभी होती...well, She did help us…and how! आज पर्यंतचा सगळ्यात झकास पिझ्झा खाल्ला आम्ही तिथे आणि दिवसाचं सार्थक झालं आमच्या :) बाकीची संध्याकाळ गेली resort च्या beach वर… कहो ना प्यार है मधला beach direct आमच्या समोर येऊन उभा होता… दोन islands च्या मधून हळू हळू क्षितिजावर नाहीसा होणारा सूर्य बघीतला आणि पायापर आलेल्या लाटेनी एक जाणीव करून दिली… देश प्रदेश वेगळा असला तरी निसर्ग आपल्याला देणार्या अनुभवांमध्ये कधीच बदल करत नाही त्यांचा परिणाम आपल्यावर तसाच होत राहतो कायम… पायाखालची वाळू सरकत जाताना मी नेहमी सारखी अंतर्मुख झाले.. दिवसभराचा आनंद आकाशातल्या लाल किरणांसारखा मनात पसरला होता..आणि सकाळी झालेली दगदग,त्रास मावळून गेले होते… उद्या नवा दिवस! नवे plans!

टिप्पण्या

Prasad Vaidya म्हणाले…
wah wah wah.......farach chhan varnan ahe.......
dusarya diwashche varnan vachayala sarva vachak aatur ahet!!!!!!! hahaha
Vivek Mone म्हणाले…
"बाकी एरवी ते सगळं जाम impressive वाटलं असतं पण एक पाय आधीच्या विमानात आणि दुसरा पुढच्या विमानात असताना.. माणसाच्या कौतुक करण्याच्या क्षमता थोssड्या मर्यादित होतात!"

ह्या ह्या ह्या !!एक नंबर लिहिलयस!!!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...