शेवटच्या वळणावर
सरत्या मातीवर पाय रोवून शिखराकडे पाहत राहावं…
पाठीवरचं वजन सांभाळून पहिलं पाउल पुढे टाकावं…
मनातले विचार अचानक मिळालेल्या मोकळ्या वेळेचा आधार घेतात
चालत्या पायांना ताल येतो...तंद्रीत हातही साथ देतात
पावसाची सरही संतत्धार ओल्या मातीत जिरत जाते…
अंगावर रोमांच आले तरी नजर दूर दूर फिरत जाते…
चेहऱ्यावरून ओघळणारा प्रत्येक थेंब आपलं असणं जाणवून देतो
मनात वेगळीच उर्मी असते..म्हणून आपणही ते समजून घेतो…
हिरव्या झाडीतले काळोखे क्षण सभोवतालची शांतता साठवून असतात…
उत्साह उत्साह आत असतो पण ओठ शांतताच बाळगून असतात
टेकाड येतं...
पायांना एव्हाना स्पर्श जाणवत नाहीसा झालेला असतो…
नव्याने पावसाचा मारा अंगावर येतो...
आणि सुकलेला शर्ट चिंब ओलेता होतो…
पाच तास…सहा तास...चालता चालता वेळेची गणती थांबलेली असते...
शेवाळल्या दगडावर दोन क्षण बसून शिखरावर नकळत नजर टाकलेली असते…
आता मागे बघणं नाही…
मनात कुठला विचार नाही...
फक्त एकच ध्यास घ्यावा…
शिखाराशिवाय थांबणार नाही!
पुढचं पाऊल…पुढचं वळण…
पुढची वाट…पुढचे क्षण…
पुढची हुरहूर…पुढचे श्वास…
पुढेच जायचं कणकण…
पावसाने आता भलताच जोर धरलेला असतो…
पण माझ्या चेहऱ्यावर आनंद भरलेला असतो…
इथवर आले म्हणूनच उर भरून उरलेला असतो…
शेवटच्या वळणावरच चढल्याचा शीण सरलेला असतो…

टिप्पण्या
Best.
Now you have reached a level where you can even experience the thrill of trekking in your mind's eye!!
I am no expert but i feel this poem has another subtle message to convey about the progress in life of a man destined for big things. Just a thought.ehe
It is a maze of illusion u create in your writings and amaze us all
ur scribs are not just illustrative but give hope a new dimension
माझ्यासाठी तर हे नेहमीचेच आहे .. शेवटच्या वळणावर .. एकदम मस्त वाटले ..
अशीच लिहित रहा ... आणि मृगेश तू आम्हाला लिंक पाठवत जा ...
Kharach sundar kavita