Off to Malaysia.. Almost!
हं…
उडण्याआधी पक्षी कधी कधी पंख फडफडवतात उन्हात उब घेत बसतात त्याची आठवण होत्ये मला आत्ता..
I am off to Malaysia... Almost!
इंदिरा गांधी आंतर राष्ट्रीय विमानतळावर गेले 3 तास मी माझ्या विमानाची वात बघत बसल्ये…
well the flight is delayed… check-in, immigration, security check आणि जेवण :) सगळं झालंय तरीही अजून तब्बल 1 तास वाट बघायचीय… विमान late आहे… म्हणून हा laptop उघडण्याचा खटाटोप… एक वर्षापूर्वी माझ्या पहिल्या विमान प्रवासाबद्दल मी जेवढी excited होते ती उत्सकता तो उत्साह आज मात्र कुठतरी हरवलाय… हल्ली माझ्या मनात उगाच आपला एक खूळ येऊन जाता कधी कधी… नाही नाही म्हणता म्हणता आपण विचार करणारे सगळ्याचं tension घेणारे मोठे झालो कि काय… नव्या ठिकाणी जाणं...नव्या माणसांना भेटणं...चुका करणं ,नेहमी perfect नसणं ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरत चाललोय की काय? पण ते खुळंच आहे याची खात्री आहे... कारण 2 तासांनी का होईना पण बाजूच्या सीट वर बसलेल्या हिप्पी मुलीला बघून तिच्याटोपितलं पीस कुठल्या पक्ष्याचा आहे या चा विचार माझ्या मनात डोकावायला लागलाय ;)
इथे यायच्या आधी संध्याकाळ कधी गेली ह्याचा मात्र बिलकुल पत्ता लागला नाही...ऑफिस मधलं काम शेवटच्या मिनिटापर्यंत करून पाठवलं खरं पण आपण सगळं नीट केलंय ना ...mail पोचलंय ना याच्याच विचारात घरी येऊन बँगा उचलल्या आणि गुरगावच्या ओल्या रस्त्यावरून जाणार्या असंख्य गाड्यांपैकी एका गाडीत मीही आपलं सामान कोंबून सुटकेचा निश्वास सोडला...नेहमीच्या माणसांशी hourly update चाललेच होते... "सांभाळून जा... काळजी घे.. अमुक विसरून नको (हो अजूनही ही सूचना मला मिळते) ह्या सगळ्या सुचानांची कविता पुन्हा एकदा ऐकली तोपर्यंत विमानतळ आलं.. नेहमीच्या सगळ्या विमानप्रवासाच्या सोपास्काराटली विशेष नमूद करायची गोष्ट अशी की आज security check ला असलेल्या बाईनं खरच cheking केलं… पाट्या टाकण्याचा प्रकार नव्हता.. उगाचच आपलं मनाला बरं वाटून गेलं.. domestic flight पेक्ष्या आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे...आज passport ला एक नवं पान attached होतं.. visa! immigration च्या counter वरच्या चष्मीश माणसाच्या काटेकोर नजरेतून माझा visa passport जाताना माझा उगाचच ठोका चुकत होता… पहिल्यांदा प्रवास करणारे प्रवासी ही माणसं कशी ओळखतात याचं मला नेहमी नवल वाटायचं .. आज कळलं माझ्या सारखा कावराबावरा चेहरा करणारे म्हणजे first time travelers हा त्यांचा मापदंड असणार :) असो.
Malaysian Airlines च्या lounge मध्ये मांडून ठेवलेल्या buffet मध्ये राजमा राईस खाल्ला आणि परत एकदा विमानाची वाट बघत बसले… आणि मग मी ते पहिलं.. duty free दुकान! इतकी वर्ष त्याबद्दल ऐकून finally आज बघायला मिळालं… आणि पाहताक्षणी असा जाणवलं की हे म्हणायला general store आहे पण खरा आहे duty free बार! वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या बाटल्या अखीव्रखीव तर्हेने रचलेली ती जागा नजर खिळवून ठेवत होती खरी.. पण मद्यपानाचा आणि माझा (सुदैवाने आणि दूरदूर) काही संबंध नसल्याने रस्त्यावरची नवरत्न तेलाची add आपण ज्या सहजतेने नजरेआड करतो त्याच लकबिनं मी त्या duty free दुकानाला मागे टाकून एका रिकाम्या सीट वर जाऊन बसले…सवयीनी passport , bording pass check केला आणि laptop उघडला.. आजूबाजूचे काही सरावलेले काही बुजलेले चेहरे बघत आता उरलेला वेळ कधी जाईल ते कळणारही नाही...24 July 09 Malaysia ला निघाले तो हा असा दिवस रात्रीत बदललाय आणि तारीख बदलायला काही मिनिटं उरल्येत.. भारताच्या बाहेर जातोय याची जाणीव करून देणारे आजूबाजूचे गोरे चेहरे बघून मनात हुरहूर तर वाटतेच आहे … पण त्या बरोबरच उद्याचा सूर्य मलेशियात बघणार हा विचार करून होतायत थोड्या गुदगुल्याही…

टिप्पण्या
yeudet ajun ata malaysia madhun updates! :)
blog var cha header atishay sundar ahe! far awdla!
http://kayvatelte.wordpress.com
:) Bon Voyage..
Malaysia तील अनुभवांची वाट पाहिन..
Rgrds
SUNNY
- mugdha
www.mugdhajoshi.wordpress.com
enjoy your long vacation.....
is it a holidaying tour or a business trip???
mhanjech, navaratna telacha ani tujha (sudaivane ki kasa mahiti nahi aani durdur) sambandha nahi he samajtay.
baki varNan changla jamlay