हट्टस्थान

गंडस्थान, वंद्यस्थान
तसं माझं ही एक हट्टस्थान

केव्हाही कधीही तिच्याकडे जावं
हक्कानं ठीय्या मारून समोर बसावं
सांगावं- मला हे हे हवंच आहे
पटवून द्यावं तिच्या लेखी ते थोडंच आहे

लहान व्हावं-
बुडबुड्यांच्या डबीसाठी रस्त्यात ठांड मांडूनच बसावं
हे घेतलंस तरच उठीन असं सांगूनच ठेवावं

उशिरा उठावं-
तुझ्याच हातचा चहा हवा असा आग्रह धरावा
पेपर वाचत वाचत भुरका घ्यावा, तो मात्र तिच्या दृष्टीनं दुराग्रह ठरावा

नवा ड्रेस घालावा-
पण matching म्हणून फक्त फक्त तिचेच कानातले घालावेत
तीही म्हणेल-'छान दिसेल, कानातले डुलतेच असावेत'

रात्री जगावं-
आदल्यादिवशीच अभ्यास करून पहिलं येण्याची मिजास दाखवावी
काँफी देण्यासाठी उठलेल्या तिला तुमची ही लकबही खास वाटावी!

मैत्रिणींबरोबर उशिरा यावं-
साडेबारा होऊनही कावर्याबावर्या चेहर्यानं घरात यावं
पुढच्या वेळी मात्र तीच सबब न देण्याचं ध्यानात ठेवावं!

नवे मार्ग निवडावे- आपला हट्ट म्हणून तिनंही ते मानून घ्यावे
आपण मात्र हक्क असल्यागत ते मागून घ्यावे!

अनेक वर्षं मधे जावीत-
तिच्या मांडीत डोकं ठेऊन झोपण्याचा हट्ट आजही आपण करावा...
त्याच सहजतेनं तिनं तोही हट्ट पुरवावा...

माझं हट्टस्थान
माझी आई माझा प्राण

तिची दूरदृष्टी म्हणून माझा हट्ट आहे
तिचंच द्रष्टेपण म्हणून नातं घट्ट आहे

टिप्पण्या

Kshitija म्हणाले…
hey dr kharach khup aapratim ahe hi kavita..keep it up
Unknown म्हणाले…
Hey...this is awesome...purely fresh and hits straight to the heart..keep writing....reading ur lekhani..is sheer joy..
संदीप म्हणाले…
asheech liheet rahaa ..liheet rahaa...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...