सुगंधी अत्तर

आनंद आनंद म्हणजे नक्की काय?
कष्टाच्या पुढचं आणि समाधानाआधीचं पाऊल…
आयुष्याच्या वाटेवर छोट्या-छोट्या वळणानंतर असलेली पाणपोई…

डोळे मिटून उघडण्यापूर्वीच झालेली खात्री?…
की सकाळी उठल्यावर आईचा चेहरा पाहण्याचं नशीब…?

केलेल्या कामाचं कौतुक होणार या विचारानच होणार्या गुदगुल्या…?
की शिकवलेला धडा अचूक आठवल्याचा गर्व…?

रिकाम्या भांड्यात पावली पडल्यावर signal वर दिसलेलं हसू…?
की उषम्यानंतरच्या सावलीचा मिळालेला हिरवा आडोसा…?

‘Yours Lovingly’ वाचल्यावरही पुन्हा एकदा वाचून झालेलं पत्र…
किंवा दोन तास रांगेत उभं राहिल्यावर हातात आलेलं दापोलीच्या रातराणीचं तिकीट…

अनेक दिवसांनी phone वर ऐकलेला एखादा आवाज…
की हसर्या खिदळणार्या सवंगड्यांनी भरून गेलेलं अंगण…

पावसाची पहिली सर…
अचानक मिळालेली डायरी…

पहाटेची काकडआरती आणि रात्रीच्या पालखीचा जल्लोष…

आनंद आनंद म्हणजे नक्की काय?
अनुभवातून मिळालेलं उत्तर आणि आठवणींचं सुगंधी अत्तर…

टिप्पण्या

NINAD VAIDYA म्हणाले…
Yours lovingly आणि रातराणीचे तिकिट ; पटले पटले, एकदम डायरेक्ट दिल से !!! :)
Unknown म्हणाले…
डोळे मिटून उघडण्यापूर्वीच झालेली खात्री?…
की सकाळी उठल्यावर आईचा चेहरा पाहण्याचं नशीब…?

wah.. really just soo beautiful n natural... as ninad says here., एकदम डायरेक्ट दिल से !!!
Yogi... Yo Rocks.. !! म्हणाले…
"अनुभवातून मिळालेलं उत्तर आणि आठवणींचं सुगंधी अत्तर…" khup chhan :)
Unknown म्हणाले…
Khup Sundar aahe ga..... very true
Vivek Mone म्हणाले…
wonderful..kasa suchta g tula he sagla?
Amod म्हणाले…
Mast ahe yaar....Layich bhari..
Aniket C म्हणाले…
Ekdam Sahi!! ...... I wonder (and of course appreciate!) how can you articulate complicated feelings so easily.....
rashmi म्हणाले…
wow ketki kya baat hai...awesome kavita...aprateem!!!!!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...