पोस्ट्स

जानेवारी, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आईस पत्र

आई तुझ्या संसाराला चाकं तरी किती ? दहा हात-पाय तुझे म्हणून का ही गति?! माझ्यावर ती पाळी आलीय कही खरं नाही... कधी मीठ अति होई कधी अळणी राही ! हिशोबाचा पाढा रोज वाढतच जातो, पण खर्च करणं भाग आहे नाईलाज होतो... ऑफिस मधे वेगळी तर्हा, अगडबंब काम! जुळवाजुळवी करता करता, माझं राम-नाम! हार मानणार नाही मी, भले न का थको? बाकी सगळं ठीक आहे... तू काळजी करू नको!