आईस पत्र
आई तुझ्या संसाराला चाकं तरी किती ?
दहा हात-पाय तुझे म्हणून का ही गति?!
माझ्यावर ती पाळी आलीय कही खरं नाही...
कधी मीठ अति होई कधी अळणी राही !
हिशोबाचा पाढा रोज वाढतच जातो,
पण खर्च करणं भाग आहे नाईलाज होतो...
ऑफिस मधे वेगळी तर्हा, अगडबंब काम!
जुळवाजुळवी करता करता, माझं राम-नाम!
हार मानणार नाही मी, भले न का थको?
बाकी सगळं ठीक आहे... तू काळजी करू नको!
दहा हात-पाय तुझे म्हणून का ही गति?!
माझ्यावर ती पाळी आलीय कही खरं नाही...
कधी मीठ अति होई कधी अळणी राही !
हिशोबाचा पाढा रोज वाढतच जातो,
पण खर्च करणं भाग आहे नाईलाज होतो...
ऑफिस मधे वेगळी तर्हा, अगडबंब काम!
जुळवाजुळवी करता करता, माझं राम-नाम!
हार मानणार नाही मी, भले न का थको?
बाकी सगळं ठीक आहे... तू काळजी करू नको!
टिप्पण्या
Thank you for ur whishes..