राहणार चेन्नई...
एक होतं जोडपं,कामाच्या पाई मु.पो.मुंबई पण राहणार चेन्नई... चेन्नईचं नाव ऐकून लोक चक्राऊन जातात पार, कपाळावर आठ्या पाडून प्रश्नांचा भडीमार, "जेवता कसे? राहता कसे? कमाल आहे बाई!" मु.पो.मुंबई पण राहणार चेन्नई! अरे देवा, रस्सम भात खाता आणि हाणता इडली डोसा? त्यात आणखीन मरणाचा उकाडा ही सोसा! आपली भाषाही नाही! मग परत यावंसं वाटत नाही? हं... मु.पो. मुंबई पण राहणार चेन्नई! हसून त्या जोड्प्यानी असे कैक प्रश्न झेलले, नवी आव्हानं नवे बदल, अगदी सहज पेलले, म्हणाली ती दोघं- "गुपित सांगतो आग्रहा पाई, मु.पो. मुंबई पण राहणार चेन्नई!" "आवडीच्या विषयात काम करायला आलो, स्वतःच्या पायावर उभं राहायला आलो, परक्या जमिनीवरही जिद्दीनं पुढे जायला आलो, समजुतीनी खर्या अर्थानी एक व्हायला आलो!" घराच्या उंबरठ्यातच त्यांचा सारा शीण जाई... मु.पो.मुंबई आणि राहणार चेन्नई :)