राहणार चेन्नई...

एक होतं जोडपं,कामाच्या पाई
मु.पो.मुंबई पण राहणार चेन्नई...

चेन्नईचं नाव ऐकून लोक चक्राऊन जातात पार,
कपाळावर आठ्या पाडून प्रश्नांचा भडीमार,
"जेवता कसे? राहता कसे? कमाल आहे बाई!"
मु.पो.मुंबई पण राहणार चेन्नई!

अरे देवा, रस्सम भात खाता आणि हाणता इडली डोसा?
त्यात आणखीन मरणाचा उकाडा ही सोसा!
आपली भाषाही नाही! मग परत यावंसं वाटत नाही?
हं... मु.पो. मुंबई पण राहणार चेन्नई!

हसून त्या जोड्प्यानी असे कैक प्रश्न झेलले,
नवी आव्हानं नवे बदल, अगदी सहज पेलले,
म्हणाली ती दोघं- "गुपित सांगतो आग्रहा पाई,
मु.पो. मुंबई पण राहणार चेन्नई!"

"आवडीच्या विषयात काम करायला आलो,
स्वतःच्या पायावर उभं राहायला आलो,
परक्या जमिनीवरही जिद्दीनं पुढे जायला आलो,
समजुतीनी खर्या अर्थानी एक व्हायला आलो!"

घराच्या उंबरठ्यातच त्यांचा सारा शीण जाई...
मु.पो.मुंबई आणि राहणार चेन्नई :)

टिप्पण्या

JANHAVI म्हणाले…
khup khup avadali kavita Ketaki......:) :)
vinayak म्हणाले…
thats too good! it expresses the fact about couples residing out; with great perfection. this is spontaneous expression of typical changing marathi community; at its very best!
Seeker of Equanimity म्हणाले…
sahi lihili ahes... the words you use... simple yet effective... :-)

you know I discovered your blog quite sometime back.... had contacted you on orkut then...

inspired... I have also started blogging :-)
kaustuk म्हणाले…
more plz! waiting for it.
अनामित म्हणाले…
Baryach divsat ithe kahi naveen vachla nahiye. Time to write again :)

~Ashwini

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...