आता कुठे...!

आहेरातल्या 'Dinner sets' नी माळ्याचा कोपरा गाठलाय,
'माझ्या' रोजच्या वस्तूंनी नव्या कपाटाचा कप्पा साठलाय,
साखरपुड्याच्या साडीनं पुन्हा एकदा बाहेरचं जग पाहिलंय,
आता कुठे आडनाव माझं तेंडोलकर व्हायला लागलंय!

आठ महिने झालेही असतील सात फेरे घेऊन,
पण अजूनही कुणी विचारलं की घरचा पत्ता?- 'मुलुंड'!
हळुहळू नवं जग मला ओळखीचं वाटायला लागलंय...
आता कुठे आडनाव माझं तेंडोलकर व्हायला लागलंय!

passport चं शेवटचं पान आता ओळखपत्र म्हणून चालत नाही!
जुन्या दोस्तानी 'कुठे असतेस?' विचारल्यावर "घरी!" म्हणून चालत नाही!
पण 'चांगल्या' चहाची नवी definition आता लक्ष्यात ठेवायला जमल्ये-
आता कुठे आडनाव माझं तेंडोलकर व्हायला लागलंय!

मोजून दोन माणसं मला 'तेंडोलकर madam' म्हणतात,
बाकी सगळे अजूनही 'आठवले junior समजतात!
दोन्ही ओळखीनं 'ओ' द्यायला मन आता तयार झालंय,
आता कुठे आडनाव माझं तेंडोलकर व्हायला लागलंय!

fast dial च्या numbers चं page बदलायला काढलंय,
कारण काळजीवाहू सरकारचं पारडं डझनावारी वाढलंय..
५०-एक नव्या म्हणींची माझ्या शब्दकोश्यात भर पडल्ये!
आता कुठे आडनाव माझं तेंडोलकर व्हायला लागलंय!

आई आणि बाबा आता प्रत्येकी दोन-दोन आहेत!
भाऊ तर होताच आता मोठी बहीणही आहे :)
प्रणवच्या मदतीनी हे 'joint venture ' होऊ घातलंय
आता कुठे आडनाव माझं तेंडोलकर व्हायला लागलंय!

टिप्पण्या

ओंकार घैसास म्हणाले…
पण 'चांगल्या' चहाची नवी definition आता लक्ष्यात ठेवायला जमल्ये- <<< yo best aahe :D
Seeker of Equanimity म्हणाले…
waahh mast ahe...
you have captured the feels of the newly married woman really well...
Swapnil... Ek alwar chahul म्हणाले…
Kya Baat hain Ketya, actually "aata Kuthe mothe jhalyasarkhe Vatatay" ase mhanaychay ka tula?
अनामित म्हणाले…
Khupaaaach chaan! Instant smile factor :-)
~Ashwini
Snigdha Prabhudesai, Dapoli म्हणाले…
Hey...good one!! All of them are so creative poems!
Kshitija म्हणाले…
hey dr khupch chan kavita ahe... kharach agdi same feelings ahet. class.. keep it up.
smita म्हणाले…
Atishay surekh aahe. Akrutrimata ha tujhya lekhanacha vishesh gun mala khup avadala. Ekandar sarvach kavita avadalya. blog chi link majhya facebook page var friends sathi share kareet aahe. : Smita
अनामित म्हणाले…
!!!!!!!!!!!!!!


- Prasad

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2