|| पाठीराखा ||
'त्या'ची वाट पहाया शिकवले मला
पण तोच माझी वाट पहात होता ||
पायी पंढरी मी निघाले जायाला,
पण 'तो' वाटेवरल्या पाणपोईत होता ||
हिमशिखरावर ओंकार मी शोधे,
पण तो शाळेतल्या पाटीवर होता ||
औदुंबराशी प्रदक्षिणा घातल्या,
दत्त म्हणून 'तो' उंबरठ्याशी उभा ||
आरत्या शेजारत्या सार्या 'त्या'साठी,
धूप दीप उदबत्ती ही लावली,
इतक्यातच 'तो' कानगोष्ट सांगे,
"भिऊ नको मी पाठीशी आहे उभा" ||
पण तोच माझी वाट पहात होता ||
पायी पंढरी मी निघाले जायाला,
पण 'तो' वाटेवरल्या पाणपोईत होता ||
हिमशिखरावर ओंकार मी शोधे,
पण तो शाळेतल्या पाटीवर होता ||
औदुंबराशी प्रदक्षिणा घातल्या,
दत्त म्हणून 'तो' उंबरठ्याशी उभा ||
आरत्या शेजारत्या सार्या 'त्या'साठी,
धूप दीप उदबत्ती ही लावली,
इतक्यातच 'तो' कानगोष्ट सांगे,
"भिऊ नको मी पाठीशी आहे उभा" ||
टिप्पण्या
God is not found in the temples they say but in the smallest of pleasures :-)