"click"
थोडे लाजून थोडे हासून हातही हाती घे.
"click"
मंदिरातल्या देवा नमुनी भव्य कमानी ये,
खांद्यावरचा पदर धरुनी हासून मी पाहे
"click"
बोटीमधुनी, विमानातुनी, फिरुनी चल येऊ,
कारंजे वा बागेमध्ये 'असे' उभे राहू
"click"
अवघडलेपण गेले आता खांद्यावरती हात,
डोळ्यामधले हासू सांगे ' हीच कायमची साथ'
"click"
तुझे कुटुंब माझे होवो,
माझे मीपण सारुनी जावो,
भेटी ऐशा कैक होवो,
क्षणन् क्षण कैद होवो...
"click ...click...click"
मोठे आपण झालो आता पिकू लागले केस,
ओलांडून मी सहजची आले ही 'साठी' ची वेस
वाढदिवस, सण-सोहळे, झाले हे साजरे,
मुले आपली परदेशाची झाली आता लेकरे...
नातू आणि नातीचा चेहरा पाहिला आज,
दोघेही ल्याली होती 'halloween ' चा साज
जाणीव झाली...
जाणीव झाली उजाडला तो दिवस आज शेवटी,
या पिढीची त्या पिढीशी व्हायला हवी भेटी
ठाऊक त्यांना असेल काय आजी आजोबांबद्दल?
संसाराच्या पसार्याचे प्रेम हेच मुद्दल?
याच दिवसासाठी केले "click " कैक फोटो,
कळावे त्यांनाही की 'आपण' कसे होतो!
ठरल्याप्रमाणे परदेशाला पाठवले एक पोस्ट,
प्रेषक होते 'आजी-आजोबा', नाव 'लग्नाची गोष्ट'!
टिप्पण्या
thanks a lot!
- Prasad Vaidya