नोकरी

पुस्तकांच्या गर्दीतून
पहाटेच्या सर्दीतून
बस पकडली थेट
आज 'Campus Placement'!

formal pant हवी
इस्त्रीचा shirt हवा
बुटाला polish हवं
tie ही जरा stylish हवा..

‘final’ चा अभ्यास
रग्गड उरला आहे
पण सध्यातरी नोकरीचाच
ज्वर चढला आहे

गणपतीला नमन
विठ्ठलाला वंदन
‘इकडे’ मात्र तटस्थ उभे
सुटाबुटातले सात जण

एकेकाचं नाव येतं
फडश्या पडतो सार्यांचा
tension ने अंत नसतो
बाथरूम च्या ‘वार्यां'चा

नाव पुकारलं जाताच माझं
पोटात येतो गोळा
‘coference room’ चं दार उघडतं
चेहरा पडतो काळा

एक round दोन rounds
गणती काही थांबत नाही
एकेक गडी बाद होतो
गळतीही थोपत नाही

‘Tell me about yourself’
समोरचा साहेब विचारतो
अचानक डोळ्यासमोर
एक मोठ्ठा तारा चमकतो!

थांबलेल्यांचे उसासे आणि
टांगत्या तलवारी खाली मान
दिवसाशेवटी उरतात
मोजकेच काही भाग्यवान
… … … …

पहाटे कधीतरी
दार हळूच उघडून येतो…
बूटही न काढता
आपण थकून झोपी जातो

काळजी करणारे ‘ते’ दोघं
उठवायला म्हणून येतात
आणि देवांसमोरचे पेढे बघून
हरखून हरखून जातात!

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Classic!!!

Asa vatla mazhyach manatale vichar lihile ahet!!!

Superb piece!!

- Prasad
Seeker of Equanimity म्हणाले…
well capture...

ekdum khara khura description ahe ithe :-)
Sushant म्हणाले…
शेवटच्या चार ओळींमुळे किती वेगळीच होते हि कविता ! तिथपर्यंत अनुभव मांडलाय पण त्या चार ओळींमध्ये खरोखरच सार्थ झाल्यासारखा भाव आहे...खूप जास्त आवडली या शेवटामुळे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...