गप्पा
छोट्याश्या कॅफेतून तलावाकडे नजर ठरलेल्या वेळेआधीच समोरचा 'तो’ हजर ‘तो’ आहे खरा चोखंदळ पण तरी थोडा अघळ पघळ झाडाची सावली पण थोडी उन्हाचीही झळ विणलेल्या खुर्च्या एखादी आळशी दुपार काचेच्या टेबलावर उन्हाचे कवडसे चिकार गप्पांना रंग रंगांच्या अनेक छटा हास्याचे मजले विचारांच्या प्रचंड लाटा अनेक दिवसांची राहिलेली भेट तरीही हृदयाला भिडलेली थेट... तलावाच्या काठावर सुर्यास्ताचा खेळ गरम कॉफीच्या वाफेवर उडून जाणारा वेळ जिभेवर तरंगणारी गप्पांची चव हळूहळू पसरणारं हवेतलं दव परत नक्की भेटायचा मिळवलेला हक्क पण भेट लगेच व्हायची नाही हे ही ठाऊक असतं पक्क हवाहवासा वाटतो... समोरचा 'तो' वल्ली... कारण गप्पांना वेळ असलेले कमीच भेटतात हल्ली!