गप्पा

छोट्याश्या कॅफेतून
तलावाकडे नजर
ठरलेल्या वेळेआधीच
समोरचा 'तो’ हजर

‘तो’ आहे खरा चोखंदळ
पण तरी थोडा अघळ पघळ
झाडाची सावली
पण थोडी उन्हाचीही झळ

विणलेल्या खुर्च्या
एखादी आळशी दुपार
काचेच्या टेबलावर
उन्हाचे कवडसे चिकार

गप्पांना रंग
रंगांच्या अनेक छटा
हास्याचे मजले
विचारांच्या प्रचंड लाटा

अनेक दिवसांची
राहिलेली भेट
तरीही हृदयाला
भिडलेली थेट...

तलावाच्या काठावर
सुर्यास्ताचा खेळ
गरम कॉफीच्या वाफेवर
उडून जाणारा वेळ

जिभेवर तरंगणारी
गप्पांची चव
हळूहळू पसरणारं
हवेतलं दव

परत नक्की भेटायचा
मिळवलेला हक्क
पण भेट लगेच व्हायची नाही
हे ही ठाऊक असतं पक्क

हवाहवासा वाटतो...
समोरचा 'तो' वल्ली...
कारण गप्पांना वेळ असलेले
कमीच भेटतात हल्ली!

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
As usual khupach chaan! :)
~Ashwini
अनामित म्हणाले…
wow..Sahich....!!!
अनामित म्हणाले…
kaychya kaychya kaychya kahi!!!! soooper doooper!!!!


- Prasad
Seeker of Equanimity म्हणाले…
sundar ahe.... kharach gappansathi vel far kami milto :-)
Sushant म्हणाले…
हि कविता वाचून मला का कोण जाणे कार्टर रोड वरच्या CCD ची आठवण झाली... यमक असलेल्या कविता हल्ली कमीच आहेत गप्पा मारणाऱ्या माणसानंसारख्या.. सहज जुळल्यासारखी आहेत कडवी सगळी... छान मजा आली वाचायला

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...