पोस्ट्स

जुलै, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेळ

हरणाच्या वेगानं रान पालथं घालणारा... सिंहाच्या डरकाळीनी 'आ' वासून उभा राहणारा... भित्र्या सश्याच्या डोळ्यात दिसणारा... घड्याळाच्या काट्याला 'आवाज' बहाल करणारा... कॉफीच्या कपसह भुर्रकन् उडून जाणारा... मावळत्या सूर्यासह समुद्रात बुडून जाणारा... मिणमिणत्या पणतीच्या ज्योतीत भासणारा... रुईच्या कापसासारखा अलगद दिसणारा... कधी स्तब्ध पाचोळ्यासारखा गप्प बसलेला... कधी उंच झोक्यानी उर भरून आलेला... क्षणांचे प्रहर, प्रहरांचे दिवस, दिवसांची तपं करणारा... आधी रडवून भिजवणारा... आणि मग खिदळून हसवणारा... वेळ...