वेळ

हरणाच्या वेगानं रान पालथं घालणारा...
सिंहाच्या डरकाळीनी 'आ' वासून उभा राहणारा...

भित्र्या सश्याच्या डोळ्यात दिसणारा...
घड्याळाच्या काट्याला 'आवाज' बहाल करणारा...

कॉफीच्या कपसह भुर्रकन् उडून जाणारा...
मावळत्या सूर्यासह समुद्रात बुडून जाणारा...

मिणमिणत्या पणतीच्या ज्योतीत भासणारा...
रुईच्या कापसासारखा अलगद दिसणारा...

कधी स्तब्ध पाचोळ्यासारखा गप्प बसलेला...
कधी उंच झोक्यानी उर भरून आलेला...

क्षणांचे प्रहर,
प्रहरांचे दिवस,
दिवसांची तपं करणारा...


आधी रडवून भिजवणारा...
आणि मग
खिदळून हसवणारा...

वेळ...

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
As usual... khup chaan :) Been a long time since the last post na?
~Ashwini

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2