ती
"कपडे ठेवलेस जागेवर?
socks कपाटात गेले का?
टेबलावरचे तुझे कागद उचललेस का?
आणि फोनचं बिल?"
socks कपाटात गेले का?
टेबलावरचे तुझे कागद उचललेस का?
आणि फोनचं बिल?"
...दमला असेल बिचारा…
जेवला असेल का?
आजचा shirt छान दिसत होता…
boss नी कौतुक केलं असेल का?...
"तुझं हे रोजचंच आहे…
उशिरा ये, मग जेऊ नको…
ठरवलेली कामं करू नको…
खरंच आपलं कठीण आहे"
उशिरा ये, मग जेऊ नको…
ठरवलेली कामं करू नको…
खरंच आपलं कठीण आहे"
....आपण किती lucky!
'हा' असा समंजस, म्हणून आपलं चाललंय…
त्याच्या support शिवाय कसं भागलं असतं?
त्याचा हसरा चेहरा पाहिल्याशिवाय कसं निभावलं असतं?...
त्याला सांगायच्या गोष्टींची यादी
ही बायको असल्याची पुष्टी
पण त्याला न सांगितलेले विचार
म्हणजे मोत्यांचे नाजूssक हार
'त्या'ला दिसणारी, बडबडणारी ती…
पण 'त्या'चाच विचार करत झुरत राहणारी ही तीच
काही प्रत्यक्ष झालेले संवाद
काही अबोल तरंग…
फरक फक्त इतकाच
एकाला प्रगट छटा, दुसरं उत्कट अंतरंग…
टिप्पण्या