पाळीच्या देवाला साकडं...
पाळीच्या देवा तुला कोपरापासून नमस्कार जीवच घेशील माझा आता इतके तुझे सोपस्कार स्त्रियांच्या वाट्याला तेवढा आणलास हा त्रास पुरूषांची पंचाईत विषय तसा खास महिन्यातून एकदा तू पाहतोस माझा अंत कडकलक्ष्मीचं रूप तुझं मी मात्र संत उपास घडतो, कान धरते, पायघड्याही घालते, होतातच शेकडो प्रदक्षिणा, हवंतर अभिषेकही करते... पण महिन्याच्या या त्रासातून एकदाची सुटका कर तुझा कोप परवडला पण हिशोब काय तो चुकता कर! हसू रडू हसू रडू मनाचे होतात खेळ मेंदूचा आणि हृदयाचा जुळेचना मेळ... वजनाच्या काट्याचं सुरु असतं अष्टांगीं नृत्य, आईसक्रीम चे डबे क्षणात होतात फस्त... Photo credit- Rajashri Productions श्रावणातल्या सणांची शपथ, अस्पृश्यतेचा आलाय वीट पाळी चांगली की वाईट? देवा ठरव एकदा नीट तू असं का करत नाहीस? कायमची सुटी दे, पाळीला मार फुली तूही मोकळा कामातून आणि सुटल्या सगळ्या मुली!