तू नकोस जाऊ दूर...
तू नकोस जाऊ दूर ओढुनी रेषा आपल्यात,
मी माझ्या बाजू, खूप आठवणी हळूच जपल्यात...
इतक्या सहजीने मोडलास तू खेळ आपला का?
मी हरायलाही तयार तरीही डाव संपला का?
तू सरळ ओळीचा नाकासमोर चाल चालणारा,
मी नागमोडीच्या वळणांमध्ये ध्यास लावणारी...
तू धीट कसा इतका करामती समजेना मजला...
तळहातावरती जीव तरीही कळेचना तुजला...
नशिबाच्या नशिबानेच आपली भेट भेदुनी गेली...
सांगु तरी रे काय?... हृदयास छेदूनि गेली...
तू तुझ्याच आयुष्यात मग्न हो आशीर्वाद तुला,
पण नको करू रे दूर असे इतक्यातच बाद मला...

टिप्पण्या