बेरीज-वजाबाकी
शोधून तुझा चेहरा मी आरशात पाहिला...
पण माझाही चेहरा मला सापडला नाही ...
दिवस होते मंतरलेले ऊब होती हवेत
बाहेर कोसळता पाऊस आणि मी तुझ्या कवेत ...
आल्याचा चहा तुझ्या हातचा खास होता,
प्रेमाच्या बेरजेवर साथीचा 'हातचा' बास होता ...
वेडे होतो आपण, एकमेकांत साखळी सारखे अडकलेले,
डोळ्यातले भाव वर वर चढत गेलेले...
कुठे गेला मधला काळ? कसे काढले आपण दिवस?
खुश होतो बहुतेक, फेडलेही काही नवस!
शोधून पाहिला चेहरा मी आरशात आज तुझा
आरशानी मात्र दाखवला चेहरा माझा ...
बदलेली मी , सुंदर प्रतिबिंब ...
पण मग डोळ्यातले ते भाव का होते वजा?
- केतकी
पण माझाही चेहरा मला सापडला नाही ...
दिवस होते मंतरलेले ऊब होती हवेत
बाहेर कोसळता पाऊस आणि मी तुझ्या कवेत ...
आल्याचा चहा तुझ्या हातचा खास होता,
प्रेमाच्या बेरजेवर साथीचा 'हातचा' बास होता ...
वेडे होतो आपण, एकमेकांत साखळी सारखे अडकलेले,
डोळ्यातले भाव वर वर चढत गेलेले...
कुठे गेला मधला काळ? कसे काढले आपण दिवस?
खुश होतो बहुतेक, फेडलेही काही नवस!
शोधून पाहिला चेहरा मी आरशात आज तुझा
आरशानी मात्र दाखवला चेहरा माझा ...
बदलेली मी , सुंदर प्रतिबिंब ...
पण मग डोळ्यातले ते भाव का होते वजा?
- केतकी
टिप्पण्या