झालं असं की माझ्या ऑफिस मधून मला नेहमीच्या networking sites वापरता येत नाहीयेत... त्यामुळे सहज चेक करण्यासाठी एकदा माझ्या ब्लॉग ची लिंक टाइप करून पाहिली and to my relief atleast this seemed to be working! ज्यांच्याशी नेहमी contact मधे असते त्यांना माझ्या या नाईलाजाबद्दल पूर्ण कल्पना आहे ... आधी चेन्नई (मद्रास), मग गुडगाँव (दिल्ली) आणि आता बंगलोर अश्या गेल्या २ वर्षात माझ्या तीन बदल्या झाल्यात आणि प्रत्येक ऑफिसच्या सवई वेगळ्या... माणसं वेगळी... आणि सहाजिकच accepted rule- breaking वेगळं! कधीतरी आयुष्यात पुढे पु. लं.च्या पुणेकर-मुंबईकर-नागपूरकर प्रमाणे दिल्लीकर-चेन्नैकार-बंगालोरकर लिहायला हरकत नाही... जैसा देस वैसा भेस करत मी हि त्या त्या गावांचा (metros चा म्हणायला हवं!) भाग बनले... आणि accepted -rule-breaking च्या यादीत भर पडत गेली :) पण या बंगलोर च्या ऑफिस मध्ये मात्र social sites च्या वापरला मज्जाव आहे data security च्या कारणासाठी .. आता या नाईलाजाला कोण काय करणार! बाबा (बाबा रामदेव नाही, माझे बाबा! ) म्हणतात तसं नाईलाज को क्या इलाज म्हणत त्यातून एक मार्ग काढला! blogging ! So here I a...