उपास मज लागला गडयांनो उपास मज लागला! विठूरायाची एकादशी, गणरायाची संकष्टी, असला-तसाला नाही माझा उपास बहु कष्टी! करूनच दाखवण्याचा निश्चय आज मनी साठला, उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला! एकच इच्छा आहे माझी 'आय-फोन' एक मिळावा, कॉलेजच्या कट्ट्यावर माझा उदो-उदो व्हावा! पालकांनीही दिली मंजुरी, एकच 'पण' घातला! उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला! पिताश्रींनी केली गर्जना, संगणकी नेले, "फेसबुक एकादशी"त्याचे नामकरण केले! संगणकाचा स्पर्शही वर्ज या दशदिनी उपवासाला, उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला! उपास माझा अलग असे सोपा तर अजिबात नसे! जो जो म्हणतो "सहज करीन", तो तो या ते जरूर फासे, विचार त्याचा करुनी केवळ कंठ आज दाटला उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला! डोके भिर-भिर फिरू लागले, हात सारखा पुढे सारे, हळूच संधी घेऊन टाकू, एकाच इच्चा मनी उरे! कधी नव्हे तो या इच्छांचा अंत आज गाठला उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला! दहावा दिवस आज असे... चार तासांची मुदत दिसे, संगणकाशी आमने-सामने.. घरातही कोणीच नसे! पडलो बळी मी अखेर अश्या मोह...
टिप्पण्या
I believe it was written when u moved back to Hometown after long time.
Chaan aahe!