छत्री

"तू जाईपर्यंत मी थांबतो" तो म्हणाला…
"मी रोजच जाते या  रस्त्यानी " तिचा बहाणा…

"तरीही थांबतो " म्हणताना त्याचा श्वास थांबतो …
तिच्या हाताची घडी, अंगाला वारा झोंबतो …

एका छत्रीतून पावसात जाताना , तिनी तिची छत्री असूनही काढली नाही
उलट्या दिशेला जायच असून तो तिच्या दिशेने प्रवास का करतोय?
हे ही विचारल नाही...

त्याने ही कधीच सांगितलं नाही 
तिच्याकडे काहीही मागितलं नाही… 

'सात चाळीस' ची लोकल स्टेशनच्या चहाच्या झुर्क्यांचा स्वाद… 
कातर वेळचे बेमुदत संवाद… 

एकाच बाकावर बसून त्याने काढलेला चिमटा,
चेहऱ्यावर मात्र खोडकळ प्रसन्नता 

ट्रेनचे दौरे रोजचे होते, अनेक भोळे विनोद होते… 
निघताना मात्र तिच वळून बघणं असे… त्याचं हसणं असे… 

... ...

तिच्या लग्नाची बातमी ऐकून मात्र त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास होता… 
चटकन मिटलेल्या डोळ्यात तुटलेल्या स्वप्नांचा भास होता… 

अपूर्ण प्रेम अधिक उत्कट असतं, तो एकदा म्हणाला होता … 
उत्कटतेची ही किंमत द्यायला तो तयार नव्हता 

रिकामी ट्रेन स्टेशनहून सुटत राहिली , सात पावलं ती चालली,
तो ही ट्रेन सोडून "कार" धारी झाला 

पण आज इतक्या वर्षांनी पाऊसाची सर अंगावर आली आणि मनात आलं… 

"छत्री लपवणारी ती कुठे असेल?
चिमटा काढणारा तो कुठे असेल?"

टिप्पण्या

sudhir म्हणाले…
chhan ahe kavita .. thod chhan ani thod sad ekach welela feel hot wachun .. i like it

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...