मंतरलेलं पाणी - भाग १
रस्ता मळलेला, धुक्यातली वाट
दगडी जुना वाडा , नदीचा काठ ||
सुती धोतराचा काठ चुरलेला
पूजेचा तांब्या हातात धरलेला
मंतरलेलं पाणी त्याला कापराचा सुगंध
मांडीवर बोटांनी तबल्याला छंद
चेहऱ्याने पोक्त आणि कठोर दिसलेला
पण मनाचा मोठेपणा नसानसात ठसलेला
आपण बरं कि आपलं काम ...
साधा होता तो, नाव त्याचं 'राम' |
पुस्तकात रमणारी स्वतःसाठी गाणारी
बारीक लाल कुंकू भुवयांच्या मधोमध लावणारी
दोन वेण्या घट्ट, मोगऱ्याचा गजरा
गोड हसू ओठांवर, गोल चेहरा गोजिरा
मंदिराच्या पायऱ्यांवर बसून पाहिलं तिनं जग
पुस्तकातल्या पात्रांची जाणवे तिला तगमग
झाकलेल्या दिव्याची नाजूक वात जणू
आई बाबांची लाडकी , नाव तिचं 'मनु' |
गावाच्या वेशीवरून पहिली रेल्वे धावणार
बातमी ऐकून आनंदानी खुलून गेला बाजार
रामाच्या मित्रांनी जंगी ठरवला बेत
'मनु'च्या मैत्रिणींनीही टांगा केला थेट
रेल्वे पाहायला जायचं...
बिन बैलाची गाडी चालताना पाहायचं ...
जाण्याची तयारी झाली, रामाने पिळली मिशी
गुलाबी साडी नेसून मनुची कळी खुलली जशी ...
कंदिलाच्या प्रकाशात...
मित्रांच्या घोळक्यात...
रेल्वेच्या आवाजात...
राम आणि मनुची नजरानजर होईल का?
'मंतरलेल्या पाण्या'ची गोष्ट पुढे जाईल का?
दगडी जुना वाडा , नदीचा काठ ||
सुती धोतराचा काठ चुरलेला
पूजेचा तांब्या हातात धरलेला
मंतरलेलं पाणी त्याला कापराचा सुगंध
मांडीवर बोटांनी तबल्याला छंद
चेहऱ्याने पोक्त आणि कठोर दिसलेला
पण मनाचा मोठेपणा नसानसात ठसलेला
आपण बरं कि आपलं काम ...
साधा होता तो, नाव त्याचं 'राम' |
पुस्तकात रमणारी स्वतःसाठी गाणारी
बारीक लाल कुंकू भुवयांच्या मधोमध लावणारी
दोन वेण्या घट्ट, मोगऱ्याचा गजरा
गोड हसू ओठांवर, गोल चेहरा गोजिरा
मंदिराच्या पायऱ्यांवर बसून पाहिलं तिनं जग
पुस्तकातल्या पात्रांची जाणवे तिला तगमग
झाकलेल्या दिव्याची नाजूक वात जणू
आई बाबांची लाडकी , नाव तिचं 'मनु' |
गावाच्या वेशीवरून पहिली रेल्वे धावणार
बातमी ऐकून आनंदानी खुलून गेला बाजार
रामाच्या मित्रांनी जंगी ठरवला बेत
'मनु'च्या मैत्रिणींनीही टांगा केला थेट
रेल्वे पाहायला जायचं...
बिन बैलाची गाडी चालताना पाहायचं ...
जाण्याची तयारी झाली, रामाने पिळली मिशी
गुलाबी साडी नेसून मनुची कळी खुलली जशी ...
कंदिलाच्या प्रकाशात...
मित्रांच्या घोळक्यात...
रेल्वेच्या आवाजात...
राम आणि मनुची नजरानजर होईल का?
'मंतरलेल्या पाण्या'ची गोष्ट पुढे जाईल का?
टिप्पण्या