गुरु
हे गुरु माझ्या गळ्याला
साथ दे आकार दे
उंच आकाशी उडाया
पंख दे आधार दे |
मार्ग जो सांगशील तू
पाठीराखा होऊनी
तन मनाने झोकुनी
त्यावरी चालेन मी |
गायनाच्या माध्यमाने
जीवनाचे दे धडे
शांततेच्या साधनेने
स्वरांशी भक्ती जडे |
शाश्वताच्या पलीकडे
लिलया नेलेस तू
खरे गाणे शोधण्याचे
द्वार उघडलेस तू |
जादुई तुझ्या स्वराला
अशीच दाद मिळो
गुरूच्या सानिध्याचा
फक्त आशीर्वाद मिळो |
साथ दे आकार दे
उंच आकाशी उडाया
पंख दे आधार दे |
मार्ग जो सांगशील तू
पाठीराखा होऊनी
तन मनाने झोकुनी
त्यावरी चालेन मी |
गायनाच्या माध्यमाने
जीवनाचे दे धडे
शांततेच्या साधनेने
स्वरांशी भक्ती जडे |
शाश्वताच्या पलीकडे
लिलया नेलेस तू
खरे गाणे शोधण्याचे
द्वार उघडलेस तू |
जादुई तुझ्या स्वराला
अशीच दाद मिळो
गुरूच्या सानिध्याचा
फक्त आशीर्वाद मिळो |
टिप्पण्या