पोस्ट्स

जून, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आला पाउस … गेला पाउस

पावसाचे ढग बघून मन एक वर्ष मागे गेलं  शोधायला लागलं मागच्या पावसाच्या आठवणी, पहात होतं, सापडतोय का कुठे तो क्षण…  संततधार पावसात भिजण्याचा, खिडकीत बसून चहाचे झुरके घेण्याचा…  हिरव्या टप्पोऱ्या थेंबाला ओंजळीत झेलण्याचा…  पण गेल्या पावसाच्या आठवणी लपून बसल्या जणू…  मग आठवलं…  मन चिंब भिजलं होतं खरं… आकंठ प्रेमात भिजलं होतं… पाउस वेशीपर्यंत आला होता आणि एक रुजलेला कोंब डूकली काढून पहात होता माझ्याकडे! चिमुकल्या डोळ्यांनी हे जग ओळखीचं आहे का ते शोधत होता  खिडकीत बसून पाऊस पहायला वेळ नव्हता… चहा तर वर्जच होता…  पण तरी ही मी भिजले… पावसाचे थेंब नाही पण चिमुकले हात हातात घेतले…  या वर्षी आता मागच्या पावसाची कसर भरून काढायची आहे  त्या चिमुकल्याला माझ्या पावसाशी ओळख करून द्यायची आहे!