पोस्ट्स

friends लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Connectivity

वेळ आहे सगळ्यांना आता connectivity ही आहे.. "दिसलास तर टिकलास" अशी या मायाजालाची नीती आहे... फक्त मनमोकळ्या गप्पांची किंमत किती आहे? दोस्तहो, हीच खरी भीती आहे..!

गप्पा

इमेज
छोट्याश्या कॅफेतून तलावाकडे नजर ठरलेल्या वेळेआधीच समोरचा 'तो’ हजर ‘तो’ आहे खरा चोखंदळ पण तरी थोडा अघळ पघळ झाडाची सावली पण थोडी उन्हाचीही झळ विणलेल्या खुर्च्या एखादी आळशी दुपार काचेच्या टेबलावर उन्हाचे कवडसे चिकार गप्पांना रंग रंगांच्या अनेक छटा हास्याचे मजले विचारांच्या प्रचंड लाटा अनेक दिवसांची राहिलेली भेट तरीही हृदयाला भिडलेली थेट... तलावाच्या काठावर सुर्यास्ताचा खेळ गरम कॉफीच्या वाफेवर उडून जाणारा वेळ जिभेवर तरंगणारी गप्पांची चव हळूहळू पसरणारं हवेतलं दव परत नक्की भेटायचा मिळवलेला हक्क पण भेट लगेच व्हायची नाही हे ही ठाऊक असतं पक्क हवाहवासा वाटतो... समोरचा 'तो' वल्ली... कारण गप्पांना वेळ असलेले कमीच भेटतात हल्ली!

थोड़ं नवीन थोड़ं जुनं

इमेज
गेल्या दोन दिवसात घडलेल्या गोष्टींचा थोडक्यात वृत्तांत... शाळेतल्या मित्राला दहा वर्षानंतर भेटले... दोन complete strangers शी जिगरी मैत्री झाली... वाईन घातलेला घरी केलेला पास्ता खाल्ला आणि amazing लागला... रात्री २ ला झोपून सकाळी ११ ला उठले तरी दुपारी ३ तास झोपले! बंगलोर च्या थंडीत Death by chocolate नावाचं अप्रतीम आईस-क्रीम खाल्लं (शेवटी) ताप चढला .. पण संध्याकाळपर्यंत उतरला :) गेले दोन दिवस घर मित्र-मैत्रिणींनी गजबजलेलं होतं... अजूनही असा वाटतंय की अत्ता संध्याकाळ होईल आणि सगळे दारात उभे राहतील.. :) काही जुनी दोस्त मंडळी काही नवीन चेहरे...