पोस्ट्स

inspiration लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रेरणा

कविता सुचते कशी? झाडावरून कैरी पडते अगदी तशी! विचारांना वेच जरा, मग हात फिरतो गरागरा! उत्साह भरतो असा मनात, कागद हवा-हवा क्षणात! शाई ही थोडी भरा, हात फिरतो गरागरा! दिसेल ते वाटे सुंदर! फावल्या वेळेची त्यात भर... श्वास घेऊ दे जराजरा, हात फिरतो गरागरा! ओसाड असतो काही वेळ, शब्दांचा जुळे ना मेळ... राग येतो तरातरा! हात फिरतो गरागरा!! एक घटना एक क्षण... आठवणींचे चोरटे कण... ओंजळिनी भराभरा हात फिरतो गरागरा! कविता सुचण्याचे भाव... "प्रेरणा" त्याचं नाव, विरळा पण तो क्षण खरा, हात फिरतो गरागरा!