पोस्ट्स

सप्टेंबर, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाउलखुणा

ओल्या वाळुवर पाउलखुणा पावलावर हळुवार येणारी लाट फेसाळ लाटेच्या तालावर डोलणारं होडीचं शीड आणि तांबडी पहाट...

गॅलरीत बसून

मनगटावर हनुवटी टेकवून दूर दूर पहात रहावं चिठ्यांच्या गालिचावर खुशाल वाचत पडून रहावं तितक्यात एक सुकलेला गुलाब वहीमधून डोकवावा गॅलरीत बसून सूर्यास्त अनुभवावा !

माझा पहिलं विमान प्रवास 4

वरून पाहिली माझी मुंबई इटुकली ती घरे हळूच मनात कुठेतरी माझंही घर स्मरे क्षणाक्षणानी सरकुनी अचाट अंतर केले पार नव्या दिशांचे नव्या जगाचे उघडे दिंडी द्वार ... आता उघडे दिंडी द्वार!!!

माझा पहिला विमान प्रवास 3

विमानाच्या खिडकीतून विस्मय दिसले सारे समोर पाहता करू लागली विमान सुंदरी हातवारे पोटामधल्या फुलपाखरांचा एक उडाला थवा विमान उड़ले आकाशात अनुभव हवा हवा ! हा हा म्हणता या पक्षाने उंच आभाळ गाठले म्हणता म्हणता कापसासारखे ढगांचे थवे साठले