वीट आलाय...

वीट आलाय...
प्रत्येक गोष्ट पैश्यात मोजण्याचा...
पैश्यासाठी माणसांना बोलण्याचा आणि बोलून घेण्याचा...
पैसे वाचवण्याचा...
पैश्याशिवाय काही भाषा नसण्याचा...
वीट आलाय...

सकाळी लवकर उठण्याचा...
चहा करून घेण्याचा...
साठीला आलेल्या कामवालीकडून निर्लज्जपणे काम करून घेण्याचा...
पेपर बिल, दुध बिल, फलाना-डीमाका बिल भरण्याचा वीट आलाय...

आरश्यातल्या चेहऱ्याकडे बघून सुंदर दिसण्याचे प्रयत्न करण्याचा...
जुना शर्ट टाकवत नाही म्हणून परत परत वापरण्याचा...
पेपरमधल्या बातम्यांनी नाराज होण्याचा...
रिक्षा वाल्याशी हुज्जत घालण्याचा... वीट आलाय...

आपण late येऊ तेव्हाच बॉस लवकर येण्याचा...
खोटं खोटं हसून गुड मॉर्निंग म्हणण्याचा...
competition च्या नावाखाली comparison करत वावरणार्यांचा...
आपणही नकळत त्याचा भाग होऊन जाण्याचा...
वीट आलाय...

गेट मधून I-card घालून निनावी बनून कंपनीत येण्याचा...
एका चुकीसाठी एक तास lecture ऐकण्याचा...
लहान म्हणून हिणवून घेण्याचा...
मोठं म्हणून अपेक्षांच्या ओझ्याचा...
वीट आलाय...

तिकीट महाग म्हणून ट्रीप कॅन्सल करण्याचा...
हक्काची सुटी मिळूनही घरी न जाता येण्याचा...
रविशंकर चा प्रोग्राम दुसर्या दिवशीच्या पेपरात वाचण्याचा...
मैत्रिणींची लग्नं orkut वरच पाहण्याचा...
वीट आलाय...

नाईलाज लपवून हसण्याचा...
मोबाईलवर तासंतास बोलण्याचा...
तरीही मनाला शांतता न मिळण्याचा...
मोबाईल बिल सुधा भरण्याचा...
वीट आलाय...

टिप्पण्या

Abhi म्हणाले…
Hi Ketki, Khul Chan lines ahet hya. I m sure tuch lihily aasashil.

Gr8
Regards,
Abhijeet
ketki Athavale म्हणाले…
Hi! I know atleast 3 Abhijeets.. Can u please introduce yourself? :)
And yes, I have written the lines myself...
Mann Ki Dhunn म्हणाले…
Hi Ketaki, very nice poem.. and too real :) mala agdi asach feel hota asta..
would like to hear more from you.

regards,
Gargee
Pune.
Prasad Vaidya म्हणाले…
mazhya manatalya goshti mandalya ahes!!!! ekdam sahi ahe...arthat mi chaha karat nahi...office madhe jat nahi....pan in general asech vatate!!! shevatache phone cha tar best ahe!!
प्रसाद साळुंखे म्हणाले…
मस्त, पण कविता लिहिल्यानंतर बरं वाटलं का? कविता लिहिली कुणी वाचली नाही तरी कुणीतरी दखल घेतय असं वाटतं, कागदाला का होईना पण सांगितल्याचं, मनातला सारा वीट त्यावर उतरवल्याचं समाधान मिळतं, मग पुन्हा डायरी बंद होते, कागद खणात जातात, आणि आपण पुन्हा बॅक टू कंटाळवाणं आयुष्य. होतं असं बर्‍याचदा.
Prasanna Joshi म्हणाले…
Pan ya hi nailajala kay ilaj?
All the best

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...