पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिवरायांचे वीर

इमेज
Two students at the base of Lohagad fort...

तू नकोस जाऊ दूर...

तू नकोस जाऊ दूर ओढुनी रेषा आपल्यात, मी माझ्या बाजू, खूप आठवणी हळूच जपल्यात... इतक्या सहजीने मोडलास तू खेळ आपला का? मी हरायलाही तयार तरीही डाव संपला का? तू सरळ ओळीचा नाकासमोर चाल चालणारा, मी नागमोडीच्या वळणांमध्ये ध्यास लावणारी... तू धीट कसा इतका करामती समजेना मजला... तळहातावरती जीव तरीही कळेचना तुजला... नशिबाच्या नशिबानेच आपली भेट भेदुनी गेली... सांगु तरी रे काय?... हृदयास छेदूनि गेली... तू तुझ्याच आयुष्यात मग्न हो आशीर्वाद तुला, पण नको करू रे दूर असे इतक्यातच बाद मला... 

मृदू स्वभावाचं गाव

इमेज
ओटावा की ऑटोवा? शब्द हळूच बोलावा ... बर्फाच्या शालीत लपलेलं गाव, त्याला प्रेमाची ऊब आणि मायेचा ओलावा || निळीशार तळी , हिरव्या गच्च बागा थेंबांनी नटलेल्या मोकळ्याश्या जागा मेपल च्या झाडांच्या लांबच लांब रांगा निसर्गाच्या मनात जणू आनंद साठावा ... ओटावा की ऑटोवा? त्याला प्रेमाची ऊब आणि मायेचा ओलावा | कधी सूर्याचं तेज, कधी पावसाची 'फेज' वाऱ्याचा झुळकीनं उडणारे केस... गॅलेरीत बसून खुशाल दिवस घालवावा ओटावा की ऑटोवा ?...मायेचा ओलावा| प्रत्येक जागेचा आपलासा एक स्वभाव असतो...  तिथल्या आयुष्याचा त्यात मुखडा दिसतो  बाकी छानछोकीचा डौल असेलही, पण या जागेचा मूळ स्वभाव, 'मृदू' असावा..  ओटावा की ऑटोवा ?...मायेचा ओलावा | घरच्यांपासून दूर, आई गेली भूर... तरी रोज व्हिडिओ मधून ऑटोवाची टूर! मथुरेचा कृष्ण जणू द्वारकेत खेळावा, ओटावा की ऑटोवा ? शब्द हळूच बोलावा ... 

पाळीच्या देवाला साकडं...

इमेज
पाळीच्या देवा तुला कोपरापासून नमस्कार जीवच घेशील माझा आता इतके तुझे सोपस्कार स्त्रियांच्या वाट्याला तेवढा आणलास हा त्रास पुरूषांची पंचाईत विषय तसा खास महिन्यातून एकदा तू पाहतोस माझा अंत कडकलक्ष्मीचं रूप तुझं मी मात्र संत उपास घडतो, कान धरते, पायघड्याही घालते, होतातच शेकडो प्रदक्षिणा, हवंतर अभिषेकही करते... पण महिन्याच्या या त्रासातून एकदाची सुटका कर तुझा कोप परवडला पण हिशोब काय तो चुकता कर! हसू रडू हसू रडू मनाचे होतात खेळ मेंदूचा आणि हृदयाचा जुळेचना मेळ... वजनाच्या काट्याचं सुरु असतं अष्टांगीं नृत्य, आईसक्रीम चे डबे क्षणात होतात फस्त... Photo credit- Rajashri Productions श्रावणातल्या सणांची शपथ, अस्पृश्यतेचा आलाय वीट पाळी चांगली की वाईट? देवा ठरव एकदा नीट तू असं का करत नाहीस? कायमची सुटी दे, पाळीला मार फुली तूही मोकळा कामातून आणि सुटल्या सगळ्या मुली!

गुरु

हे गुरु माझ्या गळ्याला साथ दे आकार दे उंच आकाशी उडाया पंख दे आधार दे | मार्ग जो सांगशील तू पाठीराखा होऊनी तन मनाने झोकुनी त्यावरी चालेन मी | गायनाच्या माध्यमाने जीवनाचे दे धडे शांततेच्या साधनेने स्वरांशी भक्ती जडे | शाश्वताच्या पलीकडे लिलया नेलेस तू खरे गाणे शोधण्याचे द्वार उघडलेस तू  | जादुई तुझ्या स्वराला अशीच दाद मिळो गुरूच्या सानिध्याचा फक्त आशीर्वाद मिळो |

मंतरलेलं पाणी - भाग १

रस्ता मळलेला, धुक्यातली वाट दगडी जुना वाडा , नदीचा काठ  || सुती धोतराचा काठ चुरलेला पूजेचा तांब्या हातात धरलेला मंतरलेलं पाणी त्याला कापराचा सुगंध मांडीवर बोटांनी तबल्याला छंद चेहऱ्याने पोक्त आणि कठोर दिसलेला पण मनाचा मोठेपणा नसानसात ठसलेला आपण बरं कि आपलं काम ... साधा होता तो, नाव त्याचं 'राम' | पुस्तकात रमणारी स्वतःसाठी गाणारी बारीक लाल कुंकू भुवयांच्या मधोमध लावणारी दोन वेण्या घट्ट, मोगऱ्याचा गजरा गोड हसू ओठांवर, गोल चेहरा गोजिरा मंदिराच्या पायऱ्यांवर बसून पाहिलं तिनं जग पुस्तकातल्या पात्रांची जाणवे तिला तगमग झाकलेल्या दिव्याची नाजूक वात जणू आई बाबांची लाडकी , नाव तिचं 'मनु' | गावाच्या वेशीवरून पहिली रेल्वे धावणार बातमी ऐकून आनंदानी खुलून गेला बाजार रामाच्या मित्रांनी जंगी ठरवला बेत 'मनु'च्या मैत्रिणींनीही टांगा केला थेट रेल्वे पाहायला जायचं... बिन बैलाची गाडी चालताना पाहायचं ... जाण्याची तयारी झाली, रामाने पिळली मिशी गुलाबी साडी नेसून मनुची कळी खुलली जशी ... कंदिलाच्या प्रकाशात... मित्रांच्या घोळक्यात... रेल्वेच्या आवा...

उन्हाळ्याची सुटी

इमेज
हात नको सोडू आजी जाऊ आपण भूर उन्हाळ्याची सुटी सुरु शाळा अजून दूर बागेत जाऊ फिरायला दादालाही घेऊ दमून मग झोपू तुझ्या कुशीत मऊ मऊ रव्याचे लाडू आणि उन्हातल्या चिकवड्या आमचा ' कडक ' पहारा आणि वाळवणाच्या साड्या लिंबाच्या सरबताची सरबत्ती लागू दे पत्त्यांच्या डावासाठी सगळी चाळ जागू दे रात्री गेले लाईट कि पेटीचा लागे सूर मोठ्यांची मैफिल आणि छोट्यांची टूरटूर संध्याकाळची धुपारती निरंजनांची आरास बागुलबुवाची गोष्ट आणि रात्रीचे भास मावळत्या सूर्यासह   ' शुभं करोति ' च्या ओळी पाय तुझे चेपल्यावर मिळणारी चिंचेची गोळी ... तुझा पदर धरून आजी जीवाची केली मुंबई , मिळेल का ग हा स्वानंद , जमवली किती पै पै ?