आनंद आनंद म्हणजे नक्की काय? कष्टाच्या पुढचं आणि समाधानाआधीचं पाऊल… आयुष्याच्या वाटेवर छोट्या-छोट्या वळणानंतर असलेली पाणपोई… डोळे मिटून उघडण्यापूर्वीच झालेली खात्री?… की सकाळी उठल्यावर आईचा चेहरा पाहण्याचं नशीब…? केलेल्या कामाचं कौतुक होणार या विचारानच होणार्या गुदगुल्या…? की शिकवलेला धडा अचूक आठवल्याचा गर्व…? रिकाम्या भांड्यात पावली पडल्यावर signal वर दिसलेलं हसू…? की उषम्यानंतरच्या सावलीचा मिळालेला हिरवा आडोसा…? ‘Yours Lovingly’ वाचल्यावरही पुन्हा एकदा वाचून झालेलं पत्र… किंवा दोन तास रांगेत उभं राहिल्यावर हातात आलेलं दापोलीच्या रातराणीचं तिकीट… अनेक दिवसांनी phone वर ऐकलेला एखादा आवाज… की हसर्या खिदळणार्या सवंगड्यांनी भरून गेलेलं अंगण… पावसाची पहिली सर… अचानक मिळालेली डायरी… पहाटेची काकडआरती आणि रात्रीच्या पालखीचा जल्लोष… आनंद आनंद म्हणजे नक्की काय? अनुभवातून मिळालेलं उत्तर आणि आठवणींचं सुगंधी अत्तर…
वीट आलाय... प्रत्येक गोष्ट पैश्यात मोजण्याचा... पैश्यासाठी माणसांना बोलण्याचा आणि बोलून घेण्याचा... पैसे वाचवण्याचा... पैश्याशिवाय काही भाषा नसण्याचा... वीट आलाय... सकाळी लवकर उठण्याचा... चहा करून घेण्याचा... साठीला आलेल्या कामवालीकडून निर्लज्जपणे काम करून घेण्याचा... पेपर बिल, दुध बिल, फलाना-डीमाका बिल भरण्याचा वीट आलाय... आरश्यातल्या चेहऱ्याकडे बघून सुंदर दिसण्याचे प्रयत्न करण्याचा... जुना शर्ट टाकवत नाही म्हणून परत परत वापरण्याचा... पेपरमधल्या बातम्यांनी नाराज होण्याचा... रिक्षा वाल्याशी हुज्जत घालण्याचा... वीट आलाय... आपण late येऊ तेव्हाच बॉस लवकर येण्याचा... खोटं खोटं हसून गुड मॉर्निंग म्हणण्याचा... competition च्या नावाखाली comparison करत वावरणार्यांचा... आपणही नकळत त्याचा भाग होऊन जाण्याचा... वीट आलाय... गेट मधून I-card घालून निनावी बनून कंपनीत येण्याचा... एका चुकीसाठी एक तास lecture ऐकण्याचा... लहान म्हणून हिणवून घेण्याचा... मोठं म्हणून अपेक्षांच्या ओझ्याचा... वीट आलाय... तिकीट महाग म्हणून ट्रीप कॅन्सल करण्याचा... हक्काची सुटी मिळूनही घरी न जाता येण्याचा... रविशंकर चा प्रोग्...
टिप्पण्या