पोस्ट्स

काम नसलेला एक जण...

काम नसलेला एक जण एकदा मला भेटला... काम नाही म्हणून फिरतो असा मला म्हणाला… मी म्हटलं त्याला अरे मुंबई मध्ये आहेस… इथे आंधळा, पांगळा सगळ्यांना अन्नाचा दाणा गावला… तुही काही काम कर… थोडं चालव तुझं डोकं… नाहीतर हात चलाखी दाखव... जमा होतील की लोकं… अगतिक झाला तो... डोळ्यात पाणी आणून म्हणाला… एक काळ होता जेव्हा झोपायचीही सवड नव्हती… पण आता मात्र माझं खातंच 'त्यानं' बंद करून टाकलं… VRS चा फॉर्म भरून मला काढून टाकलं… सांगितलं त्यानं जे नंतर, सांगीन सावकाशीनं श्रोतेहो… पण ऐकून मला त्याची कहाणी वाटली त्याच्याशी आपुलकी… गोष्ट होती त्याची आणि होती त्याच्या boss ची… Boss म्हणजे 'देव' वरचा... खातं होतं माणुसकी!

परत एकदा...

आज परत एकदा काखोटीला चंबू गबाळ बांधायची वेळ आली आहे.. परत एकदा आप्तांना अलविदा म्हणायची वेळ आली आहे.. आहे नव्या प्रवासाची आस.. पण रस्ता जुना आहे... आज परत एकदा घरी जायची वेळ आली आहे...

धुकं

तिच्या हातांची उब अजून तळव्यावर टिकून आहे... तिच्या ओठांचं मिश्कील हास्य अजून डोळ्यात साठवून आहे... तिनं हात मागे जरी आज घेतला असेल गड्या, तिच्या सहवासाचं धुकं अजूनही मी राखून आहे...

आईस पत्र

आई तुझ्या संसाराला चाकं तरी किती ? दहा हात-पाय तुझे म्हणून का ही गति?! माझ्यावर ती पाळी आलीय कही खरं नाही... कधी मीठ अति होई कधी अळणी राही ! हिशोबाचा पाढा रोज वाढतच जातो, पण खर्च करणं भाग आहे नाईलाज होतो... ऑफिस मधे वेगळी तर्हा, अगडबंब काम! जुळवाजुळवी करता करता, माझं राम-नाम! हार मानणार नाही मी, भले न का थको? बाकी सगळं ठीक आहे... तू काळजी करू नको!

कुणीही कधीही-Preface

Saw a fantastic movie called "Before Sunrise" the other day... the poem is a product of the same..

कुणीही... कधीही...

इमेज
कुणीही... कधीही... आयुष्यात... येतं जातं... आणि मनात घर करून जातं... बुकातून तिनं वर पाहावं... अन मनमोकळं हसावं... गाडी उशिराची म्हणून मी ही तिला छेडावं... तिनं बिनदिक्कत बोलाया लागावं... एखादी अशीच सकाळ... वा एकत्र जावी संध्याकाळ... गप्पा-टप्पात जावा काळ... जसा एक क्षण, नाही तास तीन-चार... कशी ओळख झाली... अं हं आठवत नाही... पण हरकत नाही... तीही बोलतच राही.. तोही बोलतच राही... तुला आवडतं गाणं... कुठलं... मलाही... तेच... कसं न कळावं फिरत बसावं... रस्त्या-गल्ल्यातून... तरी थकून न जावं... कसं... ते नं कळवं... केस भुरभुरे... जिवणी नाजूक... खुलं हास्य... असं की मला ही हसवावं... "काय झालं?" तिनं मधूनच विचारावं... टपली मारून मी नुसतंच नाही म्हणावं... कुणीही... कधीही... आयुष्यात... येतं जातं... आणि मनात घर करून जातं... गाडी तिची जशी स्टेशनात आली... नजर भिरभिर फिराया लागली... बोलण्यात लक्ष्य नाही... गाडी निघाली म्हणून मधेच घाबरवी... मी तिला पहात राहावं... निघता निघता...नंबर घ्यायचं राहून जावं... तरी ही कुणीही कधीही आयुष्यात येतं जातं... आणि मनात घर ...

थोड़ं नवीन थोड़ं जुनं

इमेज
गेल्या दोन दिवसात घडलेल्या गोष्टींचा थोडक्यात वृत्तांत... शाळेतल्या मित्राला दहा वर्षानंतर भेटले... दोन complete strangers शी जिगरी मैत्री झाली... वाईन घातलेला घरी केलेला पास्ता खाल्ला आणि amazing लागला... रात्री २ ला झोपून सकाळी ११ ला उठले तरी दुपारी ३ तास झोपले! बंगलोर च्या थंडीत Death by chocolate नावाचं अप्रतीम आईस-क्रीम खाल्लं (शेवटी) ताप चढला .. पण संध्याकाळपर्यंत उतरला :) गेले दोन दिवस घर मित्र-मैत्रिणींनी गजबजलेलं होतं... अजूनही असा वाटतंय की अत्ता संध्याकाळ होईल आणि सगळे दारात उभे राहतील.. :) काही जुनी दोस्त मंडळी काही नवीन चेहरे...