काम नसलेला एक जण...

काम नसलेला एक जण एकदा मला भेटला...
काम नाही म्हणून फिरतो असा मला म्हणाला…
मी म्हटलं त्याला अरे मुंबई मध्ये आहेस…
इथे आंधळा, पांगळा सगळ्यांना अन्नाचा दाणा गावला…

तुही काही काम कर… थोडं चालव तुझं डोकं…
नाहीतर हात चलाखी दाखव... जमा होतील की लोकं…

अगतिक झाला तो... डोळ्यात पाणी आणून म्हणाला…
एक काळ होता जेव्हा झोपायचीही सवड नव्हती…
पण आता मात्र माझं खातंच 'त्यानं' बंद करून टाकलं…
VRS चा फॉर्म भरून मला काढून टाकलं…

सांगितलं त्यानं जे नंतर, सांगीन सावकाशीनं श्रोतेहो…
पण ऐकून मला त्याची कहाणी वाटली त्याच्याशी आपुलकी…
गोष्ट होती त्याची आणि होती त्याच्या boss ची…
Boss म्हणजे 'देव' वरचा... खातं होतं माणुसकी!

टिप्पण्या

Aashutosh Katre म्हणाले…
see.. there u go.. making the most of ur idle time.. very nice thoughts expressed beautiful words.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2